Junnar Assembly Election Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Junnar Assembly Election Sharad Sonwane: जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शरद सोनावणे यांचा विजय झाला आहे. त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टर पाठवलं आहे.

Siddhi Hande

राज्यात आज विधानसभा निवडणुकीचा निकला लागला आहे. राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत फक्त एकच अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. जुन्नर तालुक्यातील अपक्ष उमेदवार शरद सोनावणे निवडून आले आहेत.शरद सोनावणे जवळपास ७००० मतांनी निवडून आले आहे. शरद सोनावणे निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर पाठवले आहे. (Junnar assembly election result)

शरद सोनावणे हे जुन्नर मतदारसंघातून अपक्ष उभे राहिले होते. त्यांच्याविरोधात महायुतीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके विरुद्ध शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar)उभे होते. त्यांनी ७ हजारांची लीड मिळवून विजय मिळवला आहे.

शरद सोनावणे हे शिंदे गटात होते. परंतु अतुल बेनकेंना (Atul Benke) उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता. दरम्यान, त्यांनी विजय मिळवला आहे. शरद सोनावणे २०१४ साली मनसेमधून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेची साथ दिली. त्यांनी २०१४ च्या टर्ममध्ये केलेल्या विकासकामांंच्या जोरावर मते मागितली होती.

शरद सोनावणे (Sharad Sonawane) यांच्यासाठी एकनाथ शिंदेनी हेलिकॉप्टर पाठवले आहे. त्यामुळे आता शरद सोनावणे पुन्हा शिंदे गटात जाणार असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी अपक्ष उमेदवारासाठी मोठे पाऊल उचलले आहे. अपक्ष उमेदवाराला घेऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आपली ताकद वाढवणार असल्याचे दिसत आहे. (Junnar assembly Election)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT