भरत मोहळकर
निवडणूक अर्ज दाखल झाले तरी महायुतीचा फॉर्म्युला काही ठरला नाही. त्यातच आता महायुतीत भाजप आणि शिंदेंनी मित्रपक्ष अजित पवारांच्या पक्षाचीच कोंडी केली आहे. भाजप आणि शिंदेंनी दादांची कोंडी कशी केली? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट बंडखोरीचा 'हेलिकॉप्टर प्लॅान' जाणून घेऊ.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं टेंशन वाढलंय. मावळमध्ये दादांच्या पक्षाच्या सुनील शेळकेंविरोधात भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांनी बापू भेगडेंना पाठींबा दिलाय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंचा दादांच्या उमेदवाराविरोधात हेलिकॉप्टर प्लान समोर आलाय. मात्र हा हेलिकॉप्टर प्लान काय आहे? त्याची माहिती जाणून घेऊ.
अर्ज भरण्याच्या 1 तास आधी शिंदे गटाचे सचिव सचिन चौधरी हेलिकॉप्टरने नाशिकला पोहचले. दिंडोरीचे धनराज महाले आणि देवळालीच्या राजश्री अहिररावांना AB फॉर्म दिले. शिंदे गटाने नाशिकमधील बंडखोरांना हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिल्याबद्दल छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केलीय. तर शिंदे गटाने मात्र आपल्या भुमिकेचं समर्थन केलंय.
महायुतीत फक्त एकनाथ शिंदेच नाही तर भाजपनेही अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधात एबी फॉर्म देत दादांच्या नेत्यांची कोंडी केली आहे. नेमक्या कोणत्या उमेदवारांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत? पाहूयात.
मोर्शी
दादांच्या पक्षाच्या देवेंद्र भुयारांविरोधात भाजपच्या उमेश यावलकरांना एबी फॉर्म
आष्टी
दादांच्या पक्षाच्या बाळासाहेब आजबेंविरोधात भाजपच्या सुरेश धस यांना उमेदवारी
जुन्नर
दादांच्या पक्षाच्या अतुल बेनकेंविरोधात भाजपच्या आशा बुचकेंना उमेदवारी
मावळ
दादांच्या पक्षाच्या सुनील शेळकेंविरोधात भाजपचा अपक्ष बापू भेगडेंना पाठींबा
कळवण
नितीन पवारांविरोधात भाजपची रमेश थोरातांना उमेदवारी
श्रीरामपूर
लहू कानडेंविरोधात शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळेंना उमेदवारी
दिंडोरी
नरहरी झिरवळांविरोधात शिंदे गटाने धनराज महालेंना उमेदवारी
देवळाली
सरोज अहिरेंविरोधात शिंदे गटाकडून राजश्री अहिररावांना एबी फॉर्म
अणुशक्तीनगर
सना मलिकांविरोधात शिंदे गटाच्या सुरेश पाटलांना उमेदवारी
पाथरी
दादांच्या पक्षाच्या राजेश विटेकरांविरोधात शिंदे गटाची सईद खान यांना उमेदवारी
दादांच्या पक्षाविरोधात मावळमध्ये सर्वपक्षीय एकजूट तर इतर 9 जागांवर महायुतीतीलच पक्षांनी दादांची कोंडी केलीय. त्यामुळे शिंदे आणि भाजपने केलेली कोंडी चर्चेतून फुटणार की मैत्रिपूर्ण लढत होणार हे 4 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.