Maharashtra Election  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Election : २ राष्ट्रवादी, २ शिवसेना आणि २ राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागावाटपात कोणाचा फायदा?

mva and mahayuti seat sharing : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे संभाव्य जागावाटप समोर आले आहेत. या जागावाटपात कोणाला फायदा झाला, हे जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

मुंबई : हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर आता झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. या दोन्ही राज्यातील विधानसभेसहित देशातील वेगवेगळ्या ४७ जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची सर्वाधिक चर्चा होत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढाई पाहायला मिळणार आहे.

महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आहे. दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही. दुसरीकडे महायुतीच्या भाजप आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीतील राजकीय पक्षांनी आतापर्यंत १८२ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. दोन्ही आघाड्यांचे संभाव्य फॉर्म्युला समोर आले आहेत. त्यामुळे या जागावाटपात काही कोणत्या राजकीय पक्षाला फायदा झाला, जाणून घेऊयात.

२०१९ साली जागावाटप कसं झालं होतं?

महाराष्ट्र विधानसभेत २८८ मतदारसंघ आहेत. मागील विधानसभ निवडणुकीत एकच शिवसेना आणि राष्ट्रवादी होती. शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली होती. मागील निवडणुकीत भाजपने १६४ जागांवर उमेदवार उतरवले होते. तर शिवसेनेने १२६ उमेदवार उतरवले होते. तर दोन जागांवर मैत्रीपूर्ण लढत लढली होती. तसेच त्यावेळी काँग्रेसने १४७ आणि राष्ट्रवादीने १२१ जागांवर निवडणूक लढवली होती. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या होत्या. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ तर काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या.

राज्यात कोणता पक्ष आहे पॉवरफुल?

महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या भाजपचे १०३, शिवसेना शिंदे गटाचे ४०, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४० आमदार आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसचे ४३, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे १५, राष्ट्रवादीचे १५ आमदार आहेत. याचबरोबर समाजवादीचे दोन, एआयएमआयएमचे दोन, पीजेपीचे दोन, मनसे , सीपीएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र जनसुराज्य शक्ती पार्टी, क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे एक-एक आमदार आहेत.

संभाव्य जागावाटपात कोणाला अधिक फायदा?

महायुतीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. यंदा भाजप १५६ जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तर शिंदे गट ७८ ते ८० जागा लढणार आहेत. त्याचबरोबर अजित पवार गट ५३ ते ५४ जागा लढणार आहेत. शिंदे गटाचे ४० आमदार, अजित पवार गटाचे ४० आमदार आहेत. गेल्या वर्षीच्या जागावाटपाच्या तुलनेत दोन्ही पक्षांना कमी जागा मिळाल्या आहेत. हाच फॉर्म्यला कायम राहाणार असेल तर भाजप यंदा २०१९ च्या तुलनेत १० जागा कमी लढत आहे.

महाविकास आघाडीच्या संभाव्य जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसला १०४ ते १०६ जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी जागांवर लढणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना यंदा ९२ ते ९६ जागा लढण्याची शक्यता आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी ८५ ते ८८ जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवताना दिसण्याची शक्यता आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT