Rohit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : रोहित पवारांना महायुतीच्या मांडीवर बसण्याची घाई, अजित पवारांचे आमदार असं का म्हणाले?

Rohit Pawar vs Amol Mitkari controversy : रोहित पवारांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रहार केला. महायुतीत जाण्याची घाई रोहित पवारांना लागल्याचा आरोप. तसेच अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी विठ्ठलाला प्रार्थना.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Amol Mitkari slams Rohit Pawar over alliance remarks : राज्यात भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्यांची आवश्यकता संपलीय. त्यामूळे या कुबड्या भाजप जाळणार असल्याची टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली होतीय. रोहित पवार यांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केलाय. रोहित पवार यांनाच महायुतीच्या मांडीवर बसण्याचे डोहाळे लागले आहेत, असा टोला मिटकरींनी लगावलाय. 'घरी नाही दाणा, तरी बाजीराव म्हणा' अशी अवस्था रोहित पवारांची झाल्याचा चिमटा त्यांनी रोहित पवारांना काढलाय.

दरम्यान, सत्तेविना अस्वस्थ झालेले रोहित पवार म्हणूनच अशा प्रकारचे 'ट्वीट' करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं मिटकरी म्हणाले. यांना कशाची 'लगीन घाई' झाली हे आम्हाला माहित आहे. मात्र, यांना मांडीवर घ्यायचं की काय करायचं?, याची नोंद महायुतीच्या डायरीत असल्याचा टोला मिटकरींनी रोहित पवारांना लगावला आहे. रोहित पवारांनी आपल्या पक्षाचे दुकान किती राहिलं, हे पाहावं. दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, असा सल्ला यावेळी आमदार मिटकरी यांनी रोहित पवारांना दिलाय.

अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत - अमोल मिटकरी

कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केलीय. मात्र, येत्या आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी, असं साकडं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विठ्ठलाला घातलंय. काल रात्री उशिरापर्यत कार्तिकी एकादशीनिमित्त मिटकरी यांच्या अकोल्यातल्या घरी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होताय.‌ याच भजनाच्या कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरींनी "विठ्ठलाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी" हा संत नामदेवांचा अभंग गायलाय.‌

याचाच धागा पकडत अमोल मिटकरी यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच आमच्यासाठी विठ्ठलाचं राज्य असल्याचं म्हटलंय. आपल्या प्रार्थनेला विठ्ठल नक्कीच पावेल, असा विश्वासही आमदार मिटकरींनी व्यक्त केलाय. आमचा नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर असावा, ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा असल्याचं मिटकरी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईसह ५ महापालिकेत ठाकरे बंधूंची युती, २ दिवसात घोषणा, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने सगळं सांगितलं, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना e-KYC केली तरीही ₹१५०० कायमचे बंद होणार, नेमकं कारण काय? समोर आली अपडेट

Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक...अत्यंत धोकादायक आणि न समजून येणारी लक्षणं, काय आहेत जाणून घ्या

Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO

Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

SCROLL FOR NEXT