Local Body Election : वारे फिरणार! राज्यात ७२ तासांत आचारसंहिता लागणार? ३ टप्प्यात निवडणुका होणार

Maharashtra local body election Date and Schedule : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे. राज्य निवडणूक आयोग बुधवारी पत्रकार परिषद घेणार असून ३ टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि २९ महापालिकांची निवडणूक होणार. आचारसंहिता लागू होण्याची शक्यता.
Maharashtra Local Body Election News
Maharashtra Local Body Polls: Election Schedule Likely Next Week; Three-Phase Plan, BMC in JanuarySaam TV Marathi News
Published On

Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samities Election Date and Schedule : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयोगाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा (Maharashtra local body election schedule) केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दिवसापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तीन टप्प्यात निवडणुका होणार आहे. पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्याच निवडणुका होतील, असे सूत्रींनी सांगितले आहे. (SEC Maharashtra press conference civic polls update news)

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विरोधकांकडून कऱण्यात येत आहे. मतदारयाद्यांमधील घोळ जोपर्यंत दुरूस्त होणार नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. पण ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती आयोगीतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात (Maharashtra civic elections three-phase notification) घेण्यासाठी आयोग लवकरच अधिसूचना जारी करणार असल्याची माहितीही आयोगातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Maharashtra Local Body Election News
Pune: पुण्यात खाकीवर डाग! २ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी PSI ताब्यात, गुन्ह्यात मदत करण्यासाठी घेतले पैसे

राज्यातील निवडणुकींचा संभाव्य कार्यक्रम - Zilla Parishad and Panchayat Samiti election timeline

राज्यात ३ टप्प्यात निवडणुका होतील, हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. आयोगाकडून यावर लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब होईलच. पहिल्या टप्प्यात नगरपालिकेच्या निवडणुका होतील. हा कार्यक्रम २१ दिवसांचा असेल, असे समजतेय. पहिल्या टप्प्यात २८९ नगरपालिकेच्या निवडणुका होतील. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. ३० ते ३५ दिवसांचा हा निवडणूक कार्यक्रम असेल. त्यामध्ये ३२ जिल्हा परिषदा व ३३१ पंचायत समित्याचा समावेश असेल. अखेरच्या टप्प्यात २९ महापालिकेच्या निवडणुका होतील. हा कार्यक्रम ३० दिवसांचा असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ३१ जानेवारी २०२५ पर्यंत राज्यातील सर्व निवडणुका पार पाडण्यात येतील.

Maharashtra Local Body Election News
Ganesh Kale Case : पुण्यात पुन्हा गँगवॉर! गणेश काळेवर गोळ्या झाडतानाचा CCTV व्हिडिओ समोर

बुधवारी आयोगाची पत्रकार परिषद...? Model code of conduct for local body elections Maharashtra

२८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, आणि २९ महापालिकांची (289 municipalities election first phase Maharashtra) निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नगरपालिकांच्या प्रभागांचे, नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झालेय. लवकरच महापालिकेच्या आरक्षणाचीही घोषणा कऱण्यात येईल. त्याशिवाय मतदारयादीदेखील अंतिम झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील २८९ नगरपालिका, नगरपरिषदा-नगरपंचायतींच्याच निवडणुका होण्याच्या शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल. त्या दिवसापासून आचारसंहिता लागू शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Local Body Election News
Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com