Pune PSI arrested in ₹2 crore bribe case : पुण्यामध्ये खाकीवर डाग लागलाय. गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपीकडे दोन कोटींची मागणी मागितल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. पहिल्या हप्त्यापोटी ४६ लाख रुपयांची लाच घेतल्याचे उघड झालेय.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५) असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून, त्यांच्या अशिलाविरुद्ध पिंपरी चिंचवड येथील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी यांच्याकडे होता. या प्रकरणात अशिलाच्या वडिलांनाही अटक झाली होती आणि त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. अशिलाला मदत करण्यासाठी व त्याच्या वडिलांच्या जामीन अर्जावर सकारात्मक भूमिका घेण्यासाठी चिंतामणी यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.
सुरुवातीला दोन लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर तपासादरम्यान चिंतामणी यांनी अचानक दोन कोटी रुपयांची मागणी केली. त्यातील एक कोटी स्वतःसाठी आणि उरलेली रक्कम एक कोटी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी असल्याचे त्यांनी फिर्यादी यांना सांगितली.
पुणे ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची पडताळणी केली आणि सापळा रचला. त्यानुसार रास्ता पेठेत तक्रारदाराकडून ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिंतामणी यांना ताब्यात घेतले. आरोपीकडून ही रक्कम जप्त केली असून, त्यात दीड लाखांच्या खऱ्या नोटा आणि ४५ लाखांच्या बनावट नोटांचा समावेश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.