Pune koregaon park accident cctv video news : पुण्यातील कोरेगाव पार्कात रविवारी पहाटे भयानक अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ कार अतिशय वेगात जाऊन दुकानाला धडकल्याचे (koregaon park accident) व्हिडिओत दिसतेय. कार भयानक (pune car accident)वेगात जाऊन धडकली अन् चेंदामेंदा झाल्याचे व्हिडिओत दिसतेय. धक्कादायक म्हणजे, या कारमध्ये पोलिसांना (pune police) दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे तरूण दारू पिऊन कार चालवत होते का? याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. (Pune Car Accident: High-Speed Crash Near Bund Garden Metro, Two Die on Spot)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ पहाटे एक कार अचानक नियंत्रण सुटले अन् मेट्रो स्टेशनच्या खांबावर जाऊन जोरात आदळली. या कारच्या धडकण्याचा आवाज इतका भयंकर अन् जोरात होता की क्षणात आजूबाच्या लोकांची गर्दी झाली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना आणि रूग्णावाहिकेला कळवले. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जवळच्या रूग्णालायत उपचार सुरू आहेत. या भयानक अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आला असून त्यामधून कारच्या वेगाचा अंदाज येत आहे.
या भीषण अपघातामध्ये हृतिक भंडारे आणि यश भंडारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच बंड गार्डनर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर जखमीला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहे. पोलिसांकडून या अपघाताचा तपास केला जात आहे. अपघाताचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून घेतला जातोय. जखमी तरूणाचा जबाबही पोलिसांकडून घेतला जात आहे.
पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनाची तांत्रिक तपासणी केली जात आहे. अपघात कसा झाला? गाडीचा वेग किती होता? तसेच मद्यप्राशनाचा संबंध आहे का? याची तपासणी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. गाडीमध्ये बियरच्या बॉटल असल्याने दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.