प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षण हे खूप महत्त्वाचे असते. शिक्षणाने माणसाला खूप काही शिकायला मिळते. प्रत्येकजण लहानपणी शाळेत जातो. तिथेच त्याचे प्राथमिक शिक्षण होते. परंतु आता शाळा आहेत परंतु शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी नाही, असं धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे. राज्यातील ३९४ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याचे समोर आले आहे.
यूडायस-प्लस’वरील ३० सप्टेंबरपर्यंतच्या नोंदणीच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ३९४ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याची नोंदणी झाली नसल्याचे समोर आले आहे. सुमारे आठ हजार शाळांमध्ये दहापेक्षा कमी मुले शिकत आहेत. ग्रामीण भागातील शाळा रिकाम्या होत असल्याचं वास्तव समोर आलं आहे.
राज्यात एकूण दोन कोटी ११ लाख ८६ हजार ९४३ विद्यार्थ्यांची नोंद झाली. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे सात हजारांनी अधिक आहे. मात्र, त्याचवेळी पाच लाख विद्यार्थ्यांची नोंदणी अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थीसंख्या लाखोंनी वाढेल, असे संकेत असले, तरी ग्रामीण शाळा रिकाम्या होण्याचे प्रमाणही तेवढेच वाढत आहेत. आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक ३७ शाळांत एकाही विद्यार्थ्याची नोंद झालेली नाही.
रत्नागिरीतील २४, नागपूरमधील २३ शाळेत एकही विद्यार्थी नाही. बुलढाण्यात २१ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. या आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ७१३ शाळांची पटसंख्या १०च्या खाली आहे. पुण्यात ६२७, रायगडमध्ये ६८२, तर सिंधुदुर्गमध्ये ५६९ शाळांत एवढीच मोजकी विद्यार्थीसंख्या आहे.
मुंबई उपनगरांतील ३६०, मुंबई शहरातील ३४, ठाण्यातील १९९ आणि पालघरमधील १२४ शाळांतही विद्यार्थ्यांची संख्या १०च्या खालीच आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी २०० ते ३००, तर काही ठिकाणी १०० ते १५० शाळा अशा श्रेणीत आहेत. राज्यात एकूण सात हजार ९४६ शाळांत केवळ १ ते दहा विद्यार्थी नोंदले गेले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.