Pune : पुण्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांना अटक, खंडणी प्रकरणात मोठी कारवाई

Pune Congress leaders arrested in extortion case : पिंपरी चिंचवडमध्ये ५० हजारांच्या खंडणी प्रकरणात काँग्रेसच्या दोन नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव गणेश दराडे यांचाही समावेश आहे.
Dhule Crime
Dhule CrimeSaam tv
Published On

Pimpri Chinchwad police arrest Youth Congress secretary : पिंपरी चिंचवडमध्ये एका दुकानदाराला खंडणी मागितल्याप्रकरणात पोलिसांनी काँग्रेसच्या दोन नेत्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश सचिवाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीमधील एका दुकानदाराकडे काँग्रेस नेत्याने ५० हजार रूपयांची खंडणी मागितली होती. दुकानदाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई केली.

दुकानाबाहेर अनाधिकृत शेड बांधल्याबद्दल पिंपरी चिंचवड मनपाकडे तक्रार करण्याची धमकी दिली अन् ५० हजार रूपयांची मागणी केल्या प्रकरणात काँग्रेसच्या दोन नेत्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पंकज बगाडे आणि गणेश दराडे अशी आहेत. गणेश दराडे हे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. ५८ वर्षाच्या किराना दुकानदाराने दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

(Pune Congress Leaders Arrested in Extortion Case, Major Police Action in Pimpri Chinchwad)

Dhule Crime
Relationships Tips : जोडीदार सोबत असताना झोप येते, चांगलं की वाईट? वाचा तज्ज्ञांनी काय सांगितले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी आरोपींनी दुकानदाराला धमकी दिली. दराडे आणि बगाडे यांनी दुकानदाराकडे जाऊन ५० हजारांची खंडणी मागितली अन् पैसे दिले नाही तर ठार मारू अशी धमकी दिली. दुकानदाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. त्यांनी आजूबाजूच्या दुकानादाराकडे चौकशी केली, त्याशिवाय सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी सत्य समोर आले. आरोपींनी याआधीही आजूबाजूच्या दुकानदाराला धमकावले होते अन् पैशांची वारंवार मागणी केली होती.

Dhule Crime
New Expressway : नागपूरमधून आणखी एक एक्सप्रेस वे जाणार, फडणवीस सरकारने दिली मान्यता

आरोपींकडून वारंवार धमकी मिळाल्यानंतर किराणा दुकानदाराने पिंपरी पोलिसात धाव घेतली. त्यांनी २६ सप्टेंबर रोजी अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कसून तपास केला. त्यांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय. त्यांना लवकरच कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Dhule Crime
Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com