
रिलायन्स जिओ सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी
रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखली जाते. जिओ आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त दरातील रिचार्जपासून ते दीर्घ कालावधीसह प्रीमियम प्लॅनपर्यंत विविध योजना उपलब्ध करून देते. त्यामुळे प्रत्येक यूजर्सच्या गरजेनुसार जिओकडे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.
यूजर्सचा कल दीर्घ-वैधता प्लॅनकडे वाढला
रिचार्ज दर वाढल्यानंतर मोबाईल यूजर्सचा कल दीर्घ-वैधता प्लॅनकडे वाढला आहे. वारंवार रिचार्जच्या त्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून जिओने आपल्या ऑफरमध्ये दीर्घकालीन वैधतेचे अधिक प्लॅन समाविष्ट करून ग्राहकांना सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
किफायतशीर आणि दीर्घ-वैधतेचे प्लॅन समाविष्ट
जिओने आपल्या रिचार्ज योजनांच्या यादीत आता किफायतशीर आणि दीर्घ-वैधतेचे प्लॅन समाविष्ट केले आहेत. यात ५६, ७०, ७२, ८४, २०० आणि ३३६ दिवसांची वैधता असलेले पर्याय आहेत. दीर्घकालीन रिचार्ज शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्लॅन अधिक फायदेशीर ठरू शकतात.
जिओकडे असा एक खास रिचार्ज प्लॅन उपलब्ध
जिओकडे असा एक खास रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे जो यूजर्सना संपूर्ण वर्षभरासाठी रिचार्जच्या त्रासातून मुक्त करतो. हा प्लॅन घेतल्यास ग्राहकांना पुढील वर्षी सप्टेंबर २०२६ पर्यंत पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे सोयीस्कर अनुभव मिळतो.
किती किमतीत उपलब्ध
जिओ सध्या आपल्या ५० कोटींपेक्षा अधिक ग्राहकांसाठी दोन आकर्षक वार्षिक रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. हे प्लॅन अनुक्रमे ३५९९ रुपये आणि ३९९९ रुपये इतक्या किमतीत उपलब्ध आहेत. दोन्ही योजनांमध्ये यूजर्सना पूर्ण ३६५ दिवसांची वैधता दिली जाते.
३५०० रुपयांचा वार्षिक प्लॅन
जिओचा ३५०० रुपयांचा वार्षिक प्लॅन ग्राहकांसाठी किफायतशीर पर्याय मानला जातो. या योजनेत संपूर्ण ३६५ दिवसांची वैधता मिळते. यूजर्सना सर्व नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
जिओचा हा वार्षिक प्रीपेड प्लॅन फायदे
जिओचा हा वार्षिक प्रीपेड प्लॅन डेटा यूजर्ससाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात एकूण ९१२ जीबीपेक्षा जास्त इंटरनेट दिले जाते. ग्राहकांना ३६५ दिवसांसाठी दररोज २.५ जीबी हाय-स्पीड डेटा वापरण्याची सुविधा मिळते, ज्यामुळे हा प्लॅन अधिक उपयुक्त ठरतो.
अनेक अतिरिक्त फायदे
या जिओ प्लॅनमुळे ग्राहकांना अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. यात जिओ होम कनेक्शनसाठी दोन महिन्यांची मोफत ट्रायल, जिओ हॉटस्टारचे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन आणि एका महिन्यासाठी जिओ सावन प्रोचा मोफत प्रवेश समाविष्ट आहे, ज्यामुळे प्लॅन अधिक आकर्षक ठरतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.