State Election Commission local body elections in Maharashtra  saamtv
महाराष्ट्र

Municipal Elections : धुरळा उडणार! आयोगाची आज महत्त्वाची बैठक, महापालिका निवडणुकीची तारीख आली समोर

Local Body Election Update: महाराष्ट्रात २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा १४ ते २० डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. आरक्षण मर्यादा ओलांडल्याने जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याची तयारी आयोगाकडून सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Municipal Elections Date Update : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी राज्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आयोगाकडून तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिका आयुक्तांची (Maharashtra Municipal Elections) आज बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरला संपल्यानंतर त्याच दिवशी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि अहिल्यानगरसह २९ प्रलंबित महापालिकांची निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तिसर्‍या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याचे समजतेय. (Maharashtra Local Body Election 2025)

राज्यातील २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे कोर्टाने या निवडणुका सध्या घेऊ नका. आरक्षण ५० टक्क्यांमध्ये आणल्यानंतर निवडणुका घ्या, असा आदेश दिला. त्यामुळे आता आयोगाने दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections 2025) घेण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. १४ डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्याची तयारी आयोगाकडून सुरू केली आहे. आयोगाने मनपा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी २९ महापालिका आयुक्तांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत मनपा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. (Maharashtra 29 Municipal Corporations election date December update)

कोणत्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार? संपूर्ण यादी -

मुंबई

नवी मुंबई

कल्याण डोंबिवली

ठाणे, पनवेल

उल्हासनगर

भिवंडी निजामपूर

मिरा भाईंदर

पिंपरी चिंचवड

वसई विरार

पुणे

सोलापूर

कोल्हापूर

अमरावती

चंद्रपूर

नाशिक

नागपूर

संभाजीनगर

मालेगाव

नांदेड

लातूर

अकोला

परभणी

धुळे

जळगाव

इचलकरंजी

अहिल्यानगर

सांगली-मिरज

जालना

जिल्हा परिषद निवडणुका २ टप्प्यात होणार?

राज्यातील २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या ठिकाणी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या प्रक्रियेला तीन आठवड्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आता मनपा निवडणुका होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यात वर्तवली जात आहे. आयोगाकडून जिल्हा परिषदा दोन टप्प्यात घेण्याचा विचार केला जात आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Tejaswini Lonari : "हलद लाविते गं..."; सरवणकरांची होणारी सून हळदीत रंगली, पाहा खास PHOTOS

Putin India Visit: ४ वर्षांनंतर व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर, ३० तासांचा मेगाप्लान; १० लाख नोकऱ्या आणि अणुकराराची शक्यता

Suraj Chavan Wife Photos: हिरवी साडी अन् हिरवी चोळी, सूरज चव्हाणच्या बायकोचे सुंदर फोटो

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT