Who is BJP candidate Sonia Gandhi in Kerala : भाजपने केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सोनिया गांधी यांना उमेदवाराला उमेदवारी दिली. होय, तुम्ही बरोबरच वाचलेय. त्यामुळे मुन्नार येथील पंचायत समितीची निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलाय. पण या काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी नाहीत, पण त्यांच्यासोबत खास कनेक्शन आहे. भाजपच्या या सोनिया गांधी नेमक्या आहेत तरी कोण? या निवडणुकीची देशात चर्चा का होतेय? याबाबत जाणून घेऊयात.
मुन्नारमधील भाजपच्या उमेदवार असलेल्या सोनिया गांधी यांचे वडील काँग्रेसचे कट्ट्रर समर्थक होते. त्यांनी आपल्या मुलीचे नाव काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावावरून ठेवले होते. सोनिया गांधी यांचे भाजप नेत्यासोबत लग्न झाले अन् त्या आता भाजपसाठी काम करत आहेत. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत केरळमध्ये भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मुन्नारमध्ये नल्लाथन्नी क्रमांक १६ वार्डमधून सोनिया गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
भाजपच्या सोनिया गांधी यांचे वडील दिवंगत दुरे राज हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. ते स्थानिक कामगार आणि काँग्रेस नेते म्हणून मुन्नरमध्ये ओळखले जात होते. दुरे राज यांनी सोनिया गांधींच्या नावांवरून आपल्या मुलीचे नाव ठेवले होते. काही वर्षांपर्यंत या सोनिया गांधी यांच्या नावाची मुन्नरमध्येच चर्चा होत होती. पण सोनिया यांचं लग्न झालं अन् परिस्थितीत बदलली. स्थानिक वृत्तपत्रांच्या रिपोर्ट्सनुसार, सोनिया यांचे पती सुभाष हे मुन्नारमधील भाजपचे पंचायत सरचिटणीस आहेत. स्थानिक राजकारणात त्यांचे चांगले वजन आहे. सोनिया या नेहमीच नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळेच त्या आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
केरळमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. ९ आणि ११ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर १३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. केरळमधील ९४१ ग्रामपंचायती, १५२ ब्लॉक पंचायती, १४ जिल्हा पंचायती, ८७ नगरपालिका आणि सहा महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे.राज्यात ७५ हजार उमेदवार मैदानात उतरले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.