FYJC ADMISSION DEADLINE EXTENDED BEFORE SSC RESULT 2026 Saam Tv
महाराष्ट्र

11th Online Admission : १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणीची मुदत वाढवली

FYJC Online Admission Process Update : दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरता येणार असून निकालानंतर पुढील टप्पा सुरू होणार आहे.

Alisha Khedekar

  • अकरावी प्रवेशासाठी नोंदणीची मुदत वाढवली

  • दहावी निकालापूर्वी ‘भाग एक’ भरता येणार

  • सहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली

  • प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि मेरिटनुसार होणार

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची प्रतीक्षा सुरू असतानाच अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने नोंदणीची मुदत वाढवली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल लागेपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल (10th Board Exam Result ) लागेपर्यंत अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे.

यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी १० एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी पोर्टल सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन संचालनालयाने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत सहा लाख ९७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली असून हा प्रतिसाद मोठा मानला जात आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा ‘भाग एक’ भरायचा असून त्यामध्ये वैयक्तिक माहिती देणे आवश्यक आहे. यात आधार क्रमांक, शाळेचा तपशील, जन्मतारीख आदी माहितीचा समावेश असतो. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची निवड आणि प्राधान्यक्रम देण्याची संधी मिळणार आहे.

अर्जाचा ‘भाग दोन’ मात्र दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच सुरू होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची निवड करता येईल. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार पार पडणार असून कोणत्याही प्रकारचा ऑफलाइन प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. इतर मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थांशी थेट संपर्क साधावा लागणार आहे. मात्र, इतर मंडळांतून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जर राज्य मंडळाच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छित असतील, तर त्यांनाही ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दरम्यान, प्रवेश प्रक्रिया शेवटच्या पात्र विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून पुढील टप्प्यांसाठी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला कांदे पोहेच कशाला? बनवा खुसखुशीत दही कचोरी, सोपी आहे रेसिपी

Maharashtra News Live Update:नांदेड जिल्ह्याचा तापमान 43° अंश डिग्री सेल्सिअसवर

Nauvari Saree Buying : ऑनलाइन नऊवारी साडी खरेदी करताय? 'या' ५ गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर पैसे जातील वाया

High Blood Pressure : खतरनाक आहेत हाय BP ची 'ही' ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरेल

Ladki Bahin Yojana : किती महिलांच्या खात्यात ₹१५०० चा हप्ता खटाखट जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT