10th SSC Result Saam Tv
महाराष्ट्र

10th SSC Result: परंपरा राखली! यंदाही दहावीच्या निकालात मुलींची बाजी

10th SSC Result Announce Today: आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा १६ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळाले आहे.

Siddhi Hande

दहावीच्या विद्यार्थ्यांचा आज निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे. यंदाही दहावीमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. मुली या मुलांपेक्षा अव्वल ठरल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुलीच दहावीच्या परीक्षेत प्रथम येत आहेत. यंदाही ही परंपरा कायम ठेवली आहे.

आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये कोण अव्वल ठरलं हेदेखील त्यांनी सांगितलं आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये दहावीची परीक्षा झाली होती. विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते. या वर्षी दहावीचा निकाल चांगला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३१ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ ने जास्त आहे.

या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विद्यार्थी बसले होते. यामध्ये १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० आहे. यामध्ये यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुली या मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुलीच सलग अव्वल येत आहेत. या वर्षीदेखील सर्वाधिक मुली पास झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Maharashtra Live News Update: धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भांडगाव येथील विश्वरुपा नदिवरील पुल ढासळला

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

SCROLL FOR NEXT