पोहण्यासाठी उतरले अन् घात झाला; MBBS चे 3 विद्यार्थी नदीत बुडाले, परिसरात खळबळ

Chandrapur News : चंद्रपूर-गडचिरोली सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीत ३ जण बुडाले. बुडालेले ३ तरुण नागपूरच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये एबीबीएसच्या पहिल्या वर्षात होते.
Chandrapur News
Chandrapur NewsX
Published On

संजय तुमराम, साम टीव्ही, प्रतिनिधी

चंद्रपूर-गडचिरोली सीमेलगतच्या वैनगंगा नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेले एमबीबीएसचे विद्यार्थी बुडाल्याची माहिती समोर आली आहे. हे तीन तरुण गडचिरोलीचे रहिवासी होते. सुट्टी असल्याने ते वैनगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार अन्य अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीलगत फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी पोहण्यासाठी वैनगंगा नदीत उड्या मारल्या. आठ पैकी तीन जण नदीत बुडाले, तर पाच पाण्यातून बाहेर निघण्यात यशस्वी झाले. घटनास्थळी पोहोचून बुडालेल्या तिघांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

Chandrapur News
पाकचं शेपूट वाकडंच! तीन तासातच युद्धविराम तोडला; जम्मूत गोळीबार, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज

बुडालेल्या तरुणांमध्ये गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे यांचा समावेश आहे. हे तिघेही गडचिरोलीचे रहिवासी असून नागपूरच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होते. या तरुणांना शोधण्यासाठी शोधकार्य सुरु होते. रात्र झाल्याने शोधमोहीत थांबवण्यात आली आहे.

Chandrapur News
पाकिस्तानशी लढण्यासाठी सीमेवर जाणाऱ्या जवानांशी गैरवर्तन, १५० रुपयांची वसुली; TTI वर रेल्वेकडून कारवाई

सुट्टीनिमित्त आठ मित्रांचा ग्रुप वैनगंगा नदीलगत फिरण्यासाठी आला होता. आठही जण नदीत उतरले. काळाने घात केला आणि तीन जण नदीपात्रात बुडाले. हे तीन जण गडचिरोलीचे असून एमबीबीएसच्या प्रथम वर्षात होते. पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणांना जीव गमवावा लागला असा अंदाज वर्तवला जात आहे.

Chandrapur News
Viral Video : हीच खरी देशभक्ती! डीसींचे एक आवाहन अन् अनेक तरूणांनी धरली भरतीची वाट, म्हणाले- सैन्याला पाठिंबा देण्यासाठी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com