Monsoon Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Update: मान्सूनने चिंता वाढवली, कधी होणार सक्रीय?; शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा

Skymet Alert: स्कायमेटने (Skymet) सांगितलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

Priya More

Mumbai News: मान्सूनने (Monsoon 2023) शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. यावर्षी केरळमध्ये मान्सूनचे (Monsoon In Kerala) उशिरा आगमन झाले. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आनंदी होत शेतकरी पेरणीच्या कामाला लागले. केरळनंतर मान्सून राज्यात देखील दाखल झाला. पण अद्याप मान्सून म्हणावा तसा सक्रीय न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अशामध्ये स्कायमेटने (Skymet) सांगितलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

अल निनोच्या परिणामांमुळे मान्सूनच्या आगमनाला फटका बसला आहे. अशामध्ये स्कायमेटने वर्तवलेला अंदाज शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढवणारा आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 'देशात येत्या 4 आठवड्यात तुरळक पाऊस पडणार आहे. येत्या 6 जुलैपर्यंत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.' यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण जोरदार पाऊस झाला नाही तर शेतीची कामं रखडून पडतील आणि त्याचाच परिणाम शेतमालावर देखील होईल.

8 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्यापाठोपाठ तो 11 जूनला तळकोकणात दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. पण मान्सून सक्रीय झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची कामं करु नये असे हवामान खात्याने सांगितले होते. पण अनेक भागांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामं केली. पण काही चांगला पाऊस पडत नसल्यामुळे हे शेतकरी चिंतेत आले आहेत. यावर्षी मान्सूचे उशिरा झालेल्या आगमनाचा परिणाम शेतीवर होणार आहे. कारण चांगला पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला. अरबी समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. हे चक्रीवादळ आज गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील अनेक भागांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे मान्सून सक्रीय होण्यास अडथळा येत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातमधील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचसोबत स्थानिक प्रशासनासोबत एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि वायूदल मदतीसाठी तयार झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT