Greece Migrants Boat: मोठी दुर्घटना! ग्रीसमध्ये ५०० प्रवाशांची बोट पाण्यात पलटली; महिलांसह बालकांचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटानास्थळी दाखल झाली आहे.
Greece Migrants Boat
Greece Migrants BoatSaam TV
Published On

Greece Boat Accident: ग्रीस येथून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. येथे परप्रांतीयांची एक बोट पाण्यात बुडाली आहे. एकून ५०० प्रवासी या बोटीने प्रवास करत होते. बोट बुडाल्याने या घटनेत तब्बल ७९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटानास्थळी दाखल झाली आहे. (Latest Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जखमींना बाहेर काढण्यासाठी तटरक्षक दलाची सहा जहाजे, नौदलाचे एक जहाज, लष्कराचे वाहतूक विमान आणि हवाई दलाचे हेलिकॉप्टर यांची मदत घेण्यात आली आहे. तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पाण्यात अडकून असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

आतापर्यंत १०४ जणांना वाचवण्यात यथ

सदर घटनेत आतापर्यंत १०४ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पाण्यातून बाहेर काढलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे. जखमी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी घटनास्थळी १२ रुग्णवाहीकांची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत ३० इजिप्शियन, १० पाकिस्तान, ३५ सीरिया आणि दोन पॅलेस्टिनी नागरिकांचा वाचवण्यात यश आलं आहे. समुद्रात बुडालेली बोट सापडली की नाही याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

या दुर्घटनेबद्दल यूएनने शोक व्यक्त केला आहे. पाण्यात अडकलेल्यांची सुटका केल्यावर त्यांना कलामाता शहरात हलवण्यात आलं आहे. येथील महापौरांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या घटनेत ६१ ते ४० वर्षांतील व्यक्तींचा जास्त समावेश आहे. महिला व लहान मुलांना देखील वाचवण्यात यश आलं आहे. मात्र अनेक व्यक्तींना या दुर्घटनेत जीव गमवावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com