Shivsena vs BJP : शिवसेनेच्या जाहिरातीला फडणवीस समर्थकांकडून प्रत्युत्तर; मुंबईत झळकले अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेचे बॅनर्स

Political News : विशेष म्हणजे या होर्डिंग्जमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे.
Eknath SHinde- Devendra Fadnavis
Eknath SHinde- Devendra FadnavisSaam Tv
Published On

Mumbai News : शिवसेनेच्या 'राष्ट्रात मोदी' महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरावरुन शिवसेना-भाजप युतीत सुरु झालेली धुसपूस अजूनही सुरुच आहे. जाहिरातीत एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा लोकप्रिय दाखवणं भाजपच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. शिवसेनेने काल नवी जाहिरात देत वातावरण काहीसं हलकं करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा झाल्याचं दिसत नाही.

कारण शिवसेनेच्या जाहिरातीला प्रत्युत्तर देणारे काही बॅनर्स आता झळकू लागले आहे. फडणवीस समर्थकांकडून ही बॅनरबाजी केली जात आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा आधार घेत मुंबईमध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

देशात नरेंद्र राज्यात देवेंद्रच, असा मेसेज मुंबईत लावण्यात आलेल्या बॅनरमधून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या होर्डिंग्जमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे.

Eknath SHinde- Devendra Fadnavis
CM Relief Fund: याला म्हणतात मुख्यमंत्री! अपघातात हात-पाय गमावलेल्या मुलाला भेटले अन् तात्काळ केली 5 लाखांची मदत

बॅनरवर काय लिहिलंय?

सबल भुजाओं में रक्षित है नौका की पतवार, चीर चले सागर की छाती पार करे मझधार!, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची ही कविता बॅनवर छापण्यात आली आहे. आचार्य पवन त्रिपाठी यांनी हे बॅनर्स लावले आहेत.  (Latest Marathi News)

Eknath SHinde- Devendra Fadnavis
Maharashtra Politics: ५० कुठं आणि १०५ कुठं?, देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है; भाजपने शिंदे गटाला पुन्हा डिवचलं

50 कुठं आणि 105 कुठं?

उल्हासनगरात भाजपने बॅनर लावत शिवसेना शिंदे गटाला थेट डिवचलं आहे. 50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!, असा मजकूर असलेले बॅनर्स उल्हासनगरात लावण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com