Lok sabha Election 2024: Maha Vikas Aghadi Finalizes 40 Seat For Maharashtra Lok Sabha Election Balasaheb Thorat Give Information Saam Tv
महाराष्ट्र

Lok sabha Election 2024: महाविकास आघाडीच्या ४० जागांचं वाटप ठरलं, बड्या नेत्यानं कन्फर्म सांगितलं!

Maha Vikas Aghadi Seat Allocation News: राज्यात महाविकास आघाडीचं 40 जागांचं गणित जुळलं आहे. याबाबत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सागर निकवाडे

Maha Vikas Aghadi (MVA) Seat Allocation:

देशात लोकसभा निवडणूक या महिन्यात कधीही जाहीर होऊ शकते. यातच सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर इंडिया आघाडीने उत्तर प्रदेश आणि दिल्लीत आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यातच राज्यात महाविकास आघाडीचं 40 जागांचं गणित जुळलं आहे. याबाबत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.

''लोकसभा निवडणूकीच्या अनुशंगाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा हा सुटला असून जवळपास 40 जागांवरील वाटप देखील निश्चित झाली आहे. फक्त चार जागांवरील जागावाटपाचा प्रश्न राहीला असून येत्या आठवड्यात बैठक घेवून तो देखील मार्गी लावून आठवडा भरात लोकसभा निवडणूकीचे उमेदवार जाहीर केल्या जाईल'', असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

''लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकरांसोबत बैठका आणि चर्चा सुरु आहे. जे सर्व लोकशाही वादी आहेत. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती विचारसरणी ज्यांना योग्य वाटत नाही, ते सर्वांनी एकत्र यावे, असे आम्हाल वाटते त्याच अनुशंगाने प्रकाश आंबेडकरांसोबत देखील बोलणी सुरु आहे'', असे देखील यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.   (Latest Marathi News)

उत्तर प्रदेशात काँग्रेस 17 जागांवर लढणार निवडणूक

दरम्यान, इंडिया आघाडीचा उत्तर प्रदेशात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस 80 पैकी 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर समाजवादी पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष इतर 63 जागांवर निवडणूक लढवतील. तसेच काँग्रेसने मध्य प्रदेशात सपाला एक जागा दिली आहे. यूपीमध्ये सपाने आपली एक जागा आझाद समाज पक्षाला दिली आहे.

यासोबतच काँग्रेस आणि आप यांच्यातही जागावाटपाचं गणित ठरलं आहे. आप आणि काँग्रेस दिल्लीसह गुजरात, हरियाणा, गोवा आणि चंदिगढ या पाच राज्यांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र निवडून लढणार आहेत. दिल्ली आप 4 तर काँग्रेस 3 जागांवर निवडणुक लढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT