Raju Shetti Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: एकेकाळी मविआसोबत असलेल्या राजू शेट्टींनी सगळी खदखद बाहेर काढली, एका बड्या नेत्याचं नाव घेत बरंच काय काय बोलले!

Raju Shetti News: महाविकास आघाडीने माझी फसवणूक केली, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

महाविकास आघाडीने माझी फसवणूक केली, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील, सतेज पाटील या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी माझ्यासोबत शेवटपर्यंत सकारात्मक चर्चा केली. माझ्याकडून ड्राफही तयार करून घेण्यात आला. मात्र नंतर त्यांना जे करायचं, तेच त्यांनी केलं, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी?

महाविकास आघाडीवर आरोप करत राजू शेट्टी म्हणाले आहेत की, ''लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर नेमकी काय भूमिका घेणार, यासंबंधित ड्राफ तयार झाला होता. हा ड्राफ जयंत पाटील आणि सतेज पाटील यांनी तयार करून घेतला होता. परंतु नंतर त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला.'' राजू शेट्टी यांच्या आरोपावर अद्याप जयंत पाटील आणि सतेज पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणूक मविआ एकत्र लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पहिल्यांदाच मविआची संयुक्त पत्रकार परिषद झाली.

यावेळी पत्रकारांनी प्रश्न केला केला की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे महायुतीला लक्ष्य केलं. ते म्हणाले, ''महायुतीचा चेहरा कोण आहे? तिन्हीच्या तिन्ही गाव ओसाड आहेत. कांद्यामुळे भाजप रडला. त्यांनी जे सोबत घेतले, तेही त्यांच्यामुळे रडले.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT