VIDEO : विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? राष्ट्रवादीच्या नेत्यानं नेमका काय दावा केला?

Maharashtra Assembly Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे, अशी बातमी समोर येत आहे.
विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला? NDA त विद्यमान आमदार उमेदवारीचे दावेदार, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawarsaam tv

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. विधानसभेसाठीच्या जागावाटपासंदर्भातील महायुतीत विद्यमान आमदारच उमेदवारीचे दावेदार असतील, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

इतर ठिकाणी निवडून येण्याच्या मेरिटवर उमेदवारी मिळेल, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरल्याची चर्चा आहे आहे.

विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला? NDA त विद्यमान आमदार उमेदवारीचे दावेदार, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
Pune News: महिलेला पोलीस ठाण्यात 'थर्ड डिग्री' टॉर्चर, पोलीस उपनिरीक्षकांसह 9 जणांवर गुन्हा दाखल

काय म्हणाले हसन मुश्रीफ?

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले की, भाजप हा मोठा पक्ष आहे, साहजिकच त्यांना जास्त जागा मिळणार. आम्ही आणि एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे, त्यांना स्वतःच्या ज्या जागा आहेत, त्या निश्चितच मिळणार.

तसेच ज्या जागांवर काँग्रेस आणि अपक्ष आहेत, त्या जागांमध्ये वाटप होईल. निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल. त्याला ती जागा मिळणार आणि त्यावर चर्चा होणार, असं ते म्हणाले आहेत.

विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला? NDA त विद्यमान आमदार उमेदवारीचे दावेदार, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा फटका बसला होता. मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजपला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात फटका बसला. यातच शुक्रवारी भाजपने आपल्या मराठा आमदारांची बैठक बोलवली. या बैठकीत भाजपचे विधानसभा आणि विधान परिषदेचे फक्त मराठा आमदार उपस्थित होते. यावेळी त्यांना सरकारने केलेलं काम मराठा समाजपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांना देण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com