madan bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara: राजकीय परिस्थिती बदलली अन् मकरंद पाटलांनी डाव साधला : मदन भाेसले

आज माजी आमदार मदन भाेसले यांनी आमदार मकरंद पाटलांवर टीका केली.

ओंकार कदम

सातारा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने यापुर्वी किसन वीर कारखान्यास (kisan veer sugar factory) आर्थिक सहाय्य केले. परंतु गत दोन वर्षांत राजकीय परिस्थिती बदलली आणि प्रशासक मंडळाने कारखान्यास पैसे देऊ नयेत यासाठी आमदार मकरंद पाटील (makrand patil) आणि त्यांचे बंधू नितीन यांनी प्रयत्न केले. पाटील बंधूंच्या राजकीय डावपेचांमुळे किसन वीर आर्थिक अडचणीत सापडला असा आराेप माजी आमदार मदन भाेसले (madan bhosale) यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. (kisan veer sugar factory election latest marathi news)

किसनवीर कारखान्या निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीत वाईचे (wai) राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील आणि कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले यांच्यात सरळ लढत होणार आहे. यामुळे संपुर्ण तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दाेन्ही गट एकमेकांवर आराेप प्रत्याराेप करीत आहेत. रविवारी आमदार मकरंद पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांची निवडणुकीतील भुमिका स्पष्ट केली. आज माजी आमदार मदन भाेसले यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली.

माजी आमदार मदन भाेसले म्हणाले किसन वीर सहकारी साखर कारखाना अडचणीत आणण्यात आमदार मकरंद पाटील आणि नितीन पाटील या दोन बंधूंचा मोठा सहभाग आहे. या दोघांनी कारखाना अडचणीत कसा येईल यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. कारखाना नीट चालू नये यासाठी ही मंडळी गेली काही वर्षे प्रयत्न करत आहेत. जिथं त्यांना संधी मिळेल तिथं त्यांनी डाव साधला.

सगळं उघड सांगताना अवघड वाटतयं

सहकारी संस्था त्यांना चालवता आले नाहीत हे सर्व जनतेच्या समोर आहे. गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आम्हाला किसन वीर साठी आर्थिक सहाय्य केले. परंतु गेल्या दोन वर्षांत राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर प्रशासक मंडळास त्यांनी आम्हांला पैसे देऊ दिले नाही. हे सगळे उघड सांगताना आता अवघड वाटत असले तरी जनतेपुढे वस्तुस्थिती यावी यासाठी सांगितल्याचे भाेसले यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

Summer Skin Care Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' ५ गोष्टी; त्वचा काळी पडणार नाही

SCROLL FOR NEXT