Onion Crop Insurance Saam TV
महाराष्ट्र

Crop Insurance: कांद्याच्या नावाखाली पीकविम्याची लूट, बोगस पीकविम्याची 7 जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू

Girish Nikam

शेतकऱ्यांना पीकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेत बोगस विमा काढून लूट केल्याचा पर्दाफाश झालाय.

खरीप हंगाम २०२४ मधील विमा योजनेत कांदा पिकासाठी सहभागाची अंतिम मुदत ३१ जुलै होती. शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्यापोटी केवळ एक रुपया द्यावा लागतो आणि उर्वरित हप्ता केंद्र आणि राज्य सरकार विमान कंपन्यांकडे भरत असतं. कांद्याचं नुकसान झाल्यास तब्बल ४६ हजार ते ८० हजार रुपयांची भरपाई शेतक-याला केली जाते. मात्र पीकविमा योजनेत कांद्याचे पावणेदोन लाख हेक्टर बोगस पीकविमा काढल्याचं समोर आलंय. शेतात काहीही नसताना तब्बल एक हजार कोटीहून अधिक कांदा पीकविमा काढण्यात आलाय.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कांदा लागवड क्षेत्र फक्त ७५ हजार ३१२ हेक्टर आहे. मात्र विमा अर्जामधील एकूण क्षेत्र दोन लाख ६३ हजार हेक्टरपर्यंत आहे. त्यामुळे या ठिकाणी पेरणी क्षेत्रापेक्षाही ३४९ टक्के जास्त क्षेत्रतब्बल पावणेदोन लाख हेक्ट बोगस पीकविमा अर्ज दाखल केल्याचं निष्पन्न झालंय.

संबंधित जिल्हा अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना कृषी आयुक्तालयानं या गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र यामुळे जे खरे कांदा उत्पादक आहेत त्यांना फटका बसण्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं व्यक्त केलीय. राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष लागवडीपेक्षा कांद्याचं अधिक क्षेत्र दाखवण्यात आलंय. बोगस पीकविम्याचा सुळसुळात असलेले कोणते जिल्हे आहेत ते जाणून घेऊ...

सर्वाधिक बोगस पीमविम्याचे जिल्हे

नाशिक जिल्ह्यात लागवड 164 हेक्टर असून दावे 46,546 हेक्टरवर करण्यात आले आहेत. धुळ्यात 530 हेक्टर कांद्याची लागवड असून दावे 8,631 हेक्टरवर करण्यात आले आहेत. अहमदनगरमध्ये 23,484 हेक्टरवर लागवड असून 36243 हेक्टरचे दावे आहेत. पुणे जिल्ह्यात 6748 हेक्टरवर प्रत्यक्षात लागवड असून 36215 हेक्टर कांदा दाखवण्यात आलाय. सोलापूरमध्ये 35595 हेक्टरवर लागवड असून 85443 हेक्टरवर विम्याचे दावे आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2337 हेक्टरवर कांदा होता. मात्र 11444 हेक्टरवर दावे करण्यात आले. बीडमध्ये 4659 हेक्टरवर प्रत्यक्षात लागवड असून दावे मात्र 23983 हेक्टरवर करण्यात आले आहेत.

कांदा कधी ग्राहकांना रडवतो तर कधी शेतक-यांना. मात्र आता बोगस पीक विम्याचा प्रकरणांमुळे ख-या उत्पादकांना रडण्याची वेळ आलीय. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ख-या शेतक-यांना फटका बसणार नाही याची काळजी प्रशासनानं घेण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT