नोकरी सोडल्यानंतर किती दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम मिळणार? जाणून घ्या नव्या कामगार कायद्याचे नियम

New labour code 2025 : नोकरी सोडल्यानंतर फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम आता दोन दिवसांत मिळणार आहे. जाणून घ्या नव्या कामगार कायद्याचे नियम.
New labour
New labour code 2025 Saam tv
Published On
Summary

नव्या कामगार कायद्यानुसार २ दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंट देणे अनिवार्य

जुन्या कायद्यात सेटलमेंटसाठी होता ३० दिवसांचा कालावधी

नवीन नियमांत पगार, रजेचा पगार आणि इतर देयकांचा समावेश

कामगार कायद्यातील बदल कर्मचार्‍यांसाठी मोठा दिलासा मानला जातोय

तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत असाल, तुमच्यासाठी खूशखबर आहे. आता फुल अँड फायनल सेटलमेंटसाठी एका महिना थांबण्याची गरज नाही. कारण कामगार कायद्यात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. नव्या कामगार कायद्यानुसार, कंपनीला दोन कामकाजाच्या दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंट करावा लागणार आहे.

काय आहेत नवीन नियम?

नव्या कायद्यानुसार, सर्व कर्मचाऱ्यांना फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम आता दोन दिवसांत द्यावी लागणार आहे. अर्जुन पालेली यांच्या मते, वेतन संहिता २०२९ च्या कलम १७ (२) मध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, 'कर्मचार्‍याच्या कामाच्या शेवटच्या दिवसानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंट द्यावा लागणार आहे. यात पगार, रजेचा पगार आणि इतर देयकांचा समावेश आहे. ग्रॅच्युटीसारखी रक्कम देखील वेगवेगळ्या वेळेत नियमानुसार दिली जाईल.

New labour
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

आतापर्यंत कंपन्यांना फुल अँड फायनल सेटलमेंटसाठी ३० दिवसांचा अवधी दिला जायचा. अनेकदा ही प्रक्रिया ३० दिवसांहून अधिक वेळ चालायची. यामध्ये रजेचा पगार, राहिलेला बोनस आणि ग्रॅच्युटीचा समावेश होता. कंपन्याचा नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्याला एक खटी रक्कम देण्याचा मानस असायचा. त्यामुळे कर्मचार्‍यांना अनेक आठवडे वाट पाहावी लागायची.

New labour
महिंद्राची जबरदस्त Formula E -कार बाजारात; रेसिंग ट्रॅकवर धुरळा उडवणार

नव्या कामगार कायद्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला, कामावरून हकालपट्टी केली तरी त्यांना ४८ तासांत फुल अँड सेटलमेंटची रक्कम द्यावी लागेल. जुन्या कायद्याच्या तुलनेत कामगार कायद्यात मोठा बदल करण्यात आला आहे. कंपनीला आधी फक्त एका महिन्याचा कालावधी होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com