Mahavatar Narsimha: 'महावतार नरसिंह' ऑस्करच्या शर्यतीत; 'डेमन हंटर्स'सह 'या' पाच चित्रपटांना देणार टक्कर

Mahavatar Narsimha: भगवान विष्णूच्या वराह आणि नरसिंह अवतारांवर आधारित "महावतार नरसिंह" हा ब्लॉकबस्टर चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत दाखल झाला आहे. सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म श्रेणीमध्ये 35 चित्रपटांसह त्याची निवड.
 Mahavatar Narsimha
Mahavatar NarsimhaSaam Tv
Published On

Mahavatar Narsimha: दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या पौराणिक अ‍ॅनिमेटेड चित्रपट "महावतार नरसिंह" ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. केवळ ४० कोटी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने देशांतर्गत २५१.३० कोटी आणि जगभरात ३२६.८२ कोटी कमाई केली. भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाचा हा विक्रम आहे. आता, १६ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या ९८ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्करसाठी देशाच्या आशा या चित्रपटावर आहेत. "महावतार नरसिंह" ला ऑस्करच्या अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म श्रेणीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे आणि जगभरातील ३५ चित्रपटांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे.

"महावतार नरसिंह" हा चित्रपट अमेरिकेतील व्यावसायिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा ऑस्करच्या शर्यतीत समाविष्ट करण्यात आला होता. अकादमी पुरस्कारांसाठी पात्रता निकषांनुसार, हा चित्रपट अमेरिकेतील एकाच ठिकाणी सलग सात दिवस प्रदर्शित झाल्यानंतर, दररोज किमान तीन शोसह शॉर्टलिस्ट करण्यात आला. नियमात असेही म्हटले आहे की यापैकी एक शो प्राइम टाइममध्ये, संध्याकाळी ६ ते रात्री १० दरम्यान असावा.

 Mahavatar Narsimha
Actors Death: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ३ ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

भगवान विष्णूच्या वराह आणि नरसिंह अवतारांची कथा

होंबळे फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, "महावतार नरसिंह" भगवान विष्णूच्या दोन अवतारांची, वराह आणि नरसिंहची कथा सांगते. "महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स" या सात चित्रपटांच्या मालिकेचा हा पहिला भाग आहे. भारतीय चित्रपटगृहांमध्ये ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर, हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

 Mahavatar Narsimha
Ticket To Finale Winner: 'या' स्पर्धकाची BB19 च्या ग्रँड फिनालेमध्ये डायरेक्ट एन्ट्री; मिळाली खास पॉवर

"महावतार नरसिंह" साठी हे ५ चित्रपट सर्वात मोठे स्पर्धक आहेत

"महावतार नरसिंह" ऑस्करच्या शर्यतीत कठीण स्पर्धेला सामोरे जाणार आहे. इफिकेसी लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या ३५ अॅनिमेटेड फीचर फिल्म्समध्ये 'केपॉप डेमन हंटर्स', 'झूटोपिया २', 'एलिओ', 'डेमन स्लेअर: इन्फिनिटी कॅसल' आणि 'ने झा २' सारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय ब्लॉकबस्टर चित्रपटांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com