Actors Death: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ३ ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Actors Death: अलिकडेच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले. आता, हॉलिवूडमधून एक नाही तर तीन चित्रपट कलाकारांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी येत आहे.
Actors Death
Actors DeathSaam tv
Published On

Actors Death: चित्रपटसृष्टीवर सध्या वाईट काळ सुरु आहे. गेल्या महिन्याभरात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचे निधन झाले आहे, ज्यात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचाही समावेश आहे. आता, तीन दिग्गज हॉलिवूड कलाकारांच्या निधनाची दुखद बातमी समोर येत आहे.

प्रसिद्ध हॉलिवूड गायक आणि अभिनेते इथन ब्राउन, मायकेल डेलानो आणि दक्षिण कोरियाचे कलाकार ली सून-जे यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या तिघांच्या अचानक निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

Actors Death
Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

इथन ब्राउन, मायकेल डेलानो आणि ली-सून-जे यांचे निधन

इथन ब्राउन, मायकेल डेलानो आणि ली-सून-जे यांचे निधन हॉलिवूड चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा धक्का आहे. इथन ब्राउन यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. त्यांचे वडील जॅक्सन ब्राउन यांनी २७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निधनाची पुष्टी केली. जॅक्सन यांना त्यांच्या मुलाच्या निधनाने खूप दुःख झाले आहे.

Actors Death
Palash Muchhal Networth: स्मृती मंधानाचा पतीची आहे इतक्या कोट्यवधींचा मालक

दरम्यान, मायकेल डेलानो हे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते होते. १९७० ते २०१३ पर्यंत इंग्रजी चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे मायकेल यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. २० ऑक्टोबर रोजी मायकेल डेलानो यांचे निधन झाल्याचे वृत्त होते, परंतु ही बातमी आताच समोर आली आहे. तथापि, हॉलिवूडमधील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील.

शिवाय, ली सून-जे यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. ते दक्षिण कोरियातील सर्वात प्रमुख चित्रपट कलाकारांपैकी एक होते. सहा दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत, ली सून-जे यांनी हॉलिवूड चित्रपटांमध्येही आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. २५ नोव्हेंबर रोजी ली सून-जे यांचे निधन दक्षिण कोरियाच्या चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com