Shruti Vilas Kadam
आगामी ‘तेरे इश्क में’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी क्रिती सॅननने सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी कविता शेअर केली असून ती जोरदार चर्चेत आहे.
कविता “तेरे इश्क में हर रंग लाल नजर आता है..” या प्रभावी ओळीने सुरू होते. यात लाल रंग प्रेम, वेदना, जोश, समर्पण यांसारख्या भावनांचे प्रतीक म्हणून दाखवला आहे.
“मोहब्बत वाला लाल, जुनून वाला लाल, दर्द वाला लाल…” अशा ओळींमधून क्रितीने प्रेमातील अनेक स्तर आणि भावनिक उतार–चढाव कवितेतून व्यक्त केले आहेत.
या कवितेतून क्रितीने अभिनयाव्यतिरिक्त तिच्या लेखनकौशल्याची छाप सोडली आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा कलात्मक पैलू आवडत आहे.
या कवितेतून क्रितीने चित्रपटातील तिच्या ‘मुक्ती’ या भूमिकेचे मनोविश्व उलगडले आहे. प्रेम, धोक्याची छाया आणि समर्पणाचा संघर्ष या भूमिकेत दिसून येतो.
क्रितीने तिच्या पोस्टमध्ये #SanonScribbles हा हॅशटॅग वापरला आहे. यावरून कळते की ही कविता तिच्या वैयक्तिक लेखनशैलीचा एक भाग आहे.
ही कविता शेअर केल्यानंतर ‘तेरे इश्क में’ विषयी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. चाहत्यांना क्रितीचा भावनिक आणि दमदार परफॉर्मन्स पाहण्याची उत्सुकता आहे.