पालिका निवडणुकीतही 50 खोके, भाजप आमदाराच्या दाव्यानं खळबळ

Political Turmoil: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदेसेनेतल्या आमदारांवर विरोधकांनी सातत्यानं ५० खोके घेतल्याचे आरोप केले. मात्र आता दुसऱ्या तिसऱ्या कुणी नव्हे तर शिंदेसेनेचा खास मित्रपक्ष असलेल्या भाजपनंच आता हे ५० खोके एकदम ओके असल्याचा खळबळजनक आरोप केलाय.....महायुतीतच खोक्यांचा वाद कसा पेटलाय...
BJP MLA Tanaji Mutkule addressing media on the 50 Khoke allegations against Shinde Sena.
BJP MLA Tanaji Mutkule addressing media on the 50 Khoke allegations against Shinde Sena.Saam Tv
Published On

शिवसेनेच्या फुटीनंतर विरोधकांच्या 50 खोके, एकदम ओक्के घोषणेची गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा रंगली होती.. मात्र शिंदेंना साथ देण्यासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगरांनी 50 कोटी घेतल्याचा खळबळजनक आरोपच भाजप आमदार तानाजी मुटकुळेंनी केलाय.. त्यामुळं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय..

दुसरीकडे महायुतीचा घटकपक्ष असतानाही भाजप आमदारानेच शिंदेसेनेवर 50 खोक्यांचा आरोप केलाय.. त्यामुळं विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय... खरंतर शिवसेना फुटीनंतर संतोष बांगरांनी शिंदेंना साथ देणाऱ्या आमदारांविरोधात मोर्चा काढला होता... एवढंच नाही तर संतोष बांगर उद्धव ठाकरेंसाठी मोर्चात रडलेही होते...

त्यामुळेच की काय उद्धव ठाकरेंसाठी रडलेले संतोष बांगर शिंदेंसोबत जाण्यामागे 50 खोके असल्याचा दावा भाजप आमदाराने केलाय.. तर शिंदेसेनेनं हा दावा फेटाळून लावलाय... त्यामुळे आधीच पैसे वाटून निवडणूका बिनविरोध केल्याचा महायुतीनप आरोप होत असताना आता भाजपनंच शिंदेसेनेवर ५० खोक्यांचा आरोप केलाय. त्यामुळे ठाकरेसेना पुन्हा एकदा शिंदेसेनेला ५० खोक्यांच्या आरोपांवरून घेणार का? शिंदेसेनेची डोकेदुखी वाढणार का ? याचीच आता चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com