Solapur Pune Highway Traffic Saam TV
महाराष्ट्र

Solapur Pune Highway Accident: सोलापूर- पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; अपघातामुळे वाहतूक ठप्प

Solapur Pune Highway Traffic: फक्त सर्विस रोड सुरू असल्याने झाली महामार्गावर ही वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur Pune Highway Accident: सोलापूर पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर पुणे महामार्गावर ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातातमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (Latest Traffic News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर पुणे (Solapur Pune Highway) राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. महामार्गावर ट्रकचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रकचा ताबा सुटल्याने मालाने भरलेला ट्रक डिवायडरवर जाऊन धडकला. सोलापूर जवळील बाळे ब्रीजजवळ हा अपघात झाला आहे.

या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी (Traffic) झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. फक्त सर्विस रोड सुरू असल्याने झाली महामार्गावर ही वाहतूक कोंडी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ट्रॅफिक पोलिसांचे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र तासाभरापासून वाहतूक ठप्प झाली आहे. (Accident News)

दरम्यान, काल (१, जून) अकोला- हैद्राबाद महामार्गावर एका भीषण अपघाताची घटना समोर आली होती. कार ,स्कूल बस व दुचाकीमध्ये हा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  दुचाकी चालकाचा अंदाज चुकल्याने कार, स्कूल बस आणि दुचाकीमध्ये हा विचित्र अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये आज प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेसाठी आजपासून शिंदेंच्या शिवसेनेच्या मुलाखती

Gharkul Yojana : मावळात कातकरी-ठाकर समाजाला मिळणार हक्काचे घर, सरकार थेट कॉलनी उभारणार

SCROLL FOR NEXT