Bhandara Crime News: भंडाऱ्यात चाललंय काय? दारुसाठी पैसे दिले नाही, संतप्त मुलाने आईवर केले तलवारीने वार

Bhandara Police: दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तरुणाचे आईसोबत जोरदार भांडण झाले. त्यानंतर त्याने आईवर हल्ला केला.
Bhandara Crime News
Bhandara Crime NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara Police: भंडाऱ्यामध्ये गुन्हेगारीच्या (Bhandara Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हत्या, चोरी, जीवघेणा हल्ला यासारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशामध्ये भंडाऱ्यात एका तरुणाने आपल्या आईवरच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Bhandara Police) आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Bhandara Crime News
Sangli Crime News: घरातील वस्तू चोरी गेल्याचा राग, वहिनीने केली लहान दिराची हत्या; भयानक घटनेनं सांगली हादरली

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहरातील शहीद वार्डात ही घटना घडली आहे. याठिकाणी मुन्ना निनावे हा तरुण आपल्या आईसोबत राहतो. कमी वयातच मुन्नाला दारुचे व्यसन लागले. दारु पिऊन तो आईला नेहमी त्रास द्यायचा. दारुसाठी पैसे मिळावे यासाठी तो आईसोबतत सतत भांडण करायचा. आज सकाळी देखील मुन्नाचे दारुसाठी आईकडे पैसे मागितले. पण आईने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याच्यामध्ये जोरदार भांडण झाले.

Bhandara Crime News
Eknath Shinde Big Announcement: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शिवप्रेमींना गिफ्ट; किल्ले रायगडावरून केल्या ३ मोठ्या घोषणा

भांडणादरम्यान संतप्त झालेल्या मुन्नाने आईवर तलवारीने वार केले. या हल्ल्यामध्ये मुन्नाची आई माधुरी निनावे (60 वर्षे) या गंभीर जखमी झाल्या. माधुरी यांच्या मानेवर आणि पोटावर मुन्नाने तलवारीने वार केले. या हल्ल्यात माधुरी गंभीर जखमी झाल्या. जखमी माधुरी यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आईवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर मुन्नाने तलवार नाल्यामध्ये फेकून दिली. त्यानंतर त्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

या हल्ल्यात जखमी झालेल्या माधुरी निनावे यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरु आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी गांधी चौकात एका तरुणाची चाकूने हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. सततच्या या घटनांमुळे भंडाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे. अशामध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com