India TV-CNX Survey Saam Tv
महाराष्ट्र

India TV-CNX Survey: ...तर भाजपला महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये धक्का बसेल; सर्वेक्षणातून निष्कर्ष, लोकसभा निवडणुकीचं कसं असेल समीकरण?

साम टिव्ही ब्युरो

India TV-CNX Survey: पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यातच 26 विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' नावाची नवीन आघाडी तयार केली आहे. हे सर्व पक्ष सार्वत्रिक निवडणुका एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे भाजपनेही आपला एनडीएचा विस्तार केला असून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा धक्का बसू शकतो, असं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. India TV आणि CNX ने हे सर्वेक्षण केलं आहे. एनडीए आघाडीला गेल्या वेळेच्या तुलनेत कमी जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात वर्तवण्यात आली आहे.

'इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स'च्या ओपिनियन पोलमध्ये विविध राज्यांची आकडेवारी दाखवण्यात आली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर, गेल्या वेळी येथे शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढले होते. भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेना 18 जागांवर विजयी झाली होती. याशिवाय काँग्रेसने एक, राष्ट्रवादीने चार, एआयएमआयएमला एक जागा आणि इतरांना एक जागा मिळाली. (Latest Marathi News)

आता ताज्या सर्वेक्षणात भाजपला महाराष्ट्रात 20 जागा मिळू शकतात. म्हणजेच गेल्या वेळेपेक्षा तीन कमी. तर शिवसेनेला (शिंदे) दोन आणि राष्ट्रवादीला (अजित पवार) दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रात एनडीएला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकूण 24 जागा एनडीएच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे, जी गेल्या वेळच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्याचबरोबर काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो. काँग्रेसला 9, शिवसेना (उद्धव ठाकरे) 11, राष्ट्रवादी (शरद) चार जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीला 24-24 जागा मिळू शकतात.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये 42 जागांपैकी टीएमसी 29 जागा जिंकू शकते. त्याचबरोबर भाजपच्या जागा गेल्या वेळच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. भाजपला 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एक जागा मिळू शकते. त्याचवेळी या सर्वेक्षणात डाव्या आघाडीचे खातेही उघडलेले दिसत नाही.

मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला 37%, टीएमसीला 48%, डाव्यांना 5%, कॉंग्रेसला 6% मिळू शकतात. गेल्या वेळेपेक्षा यावेळी भाजपला सहा जागा कमी मिळू शकतात. टीएमसीला सात जागांची आघाडी मिळू शकते, तर गेल्या वेळी काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

SCROLL FOR NEXT