Uddhav Thackeray Latest News: मला बऱ्याच दिवसांनी माहेरची माणसे भेटली: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Latest Statement: मला बऱ्याच दिवसांनी माहेरची माणसे भेटली: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Latest News
Uddhav Thackeray Latest NewsSaam Tv
Published On

Uddhav Thackeray Latest News: मला बऱ्याच दिवसांनी माहेरची माणसे भेटली, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आज द फोटोग्राफीक सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय विद्या भवनच्या वतीने आयोजित एकवीसाव्या पीएसआय इंटरनॅशनल फोटोग्राफी एक्सिबिशन 2023 चे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''बऱ्याच दिवसांनी माहेरची माणसे भेटली. सध्या जे काही चाललं आहे, त्यामुळे कोणाचा फोटो कधी कोणासोबत येईल, हे सांगता येत नाही. तसेच फोटो मधला एखादा कधी कोण गायब होईल, हेही सांगता येत नाही.''

Uddhav Thackeray Latest News
Justice Devendra Kumar Upadhyaya: मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? जाणून घ्या त्यांची कारकिर्द

उद्धव ठाकरे म्हणाले, ''येथे माझ्या नावासमोर माजी मुख्यमंत्री असं लिहिलं आहे, मात्र मी कधीही एक्स फोटोग्राफर होणार नाही. कलेचा वारसा मला माझ्या वडिलांकडून लाभला आहे.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''पूर्वी माझी एक मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी मुलाखतकाराने मला विचारलं होत की, तुमचे वडील शिवसेनाप्रमुख मोठे राजकीय नेते आहेत. ते उत्तम व्यंगचित्रकार देखील आहेत. त्यांच्याकडून यापैकी एकच कोणता वारसा घ्यायचा झाला तर तुम्ही कोणता घ्याल? मी क्षणाचाही विलंब न लावता म्हटलं होत कलेचा वारसा घेणार.''

Uddhav Thackeray Latest News
Thane Cancer Hospital: डोंबिवलीत लवकरच अद्ययावत कॅन्सर रुग्णालय उभारणार, कसं असेल, काय असतील सुविधा?

एकनाथ शिंदे यांना लगावला टोला

उद्धव ठाकरे म्हणाले, ''कला ही रक्तात असावी लागते. कलाही विकत घेतली जाऊ शकत नाही.'' ते म्हणाले, आमच्याकडच्या काही कलाकृती काही जणांनी विकत घेतल्या. मात्र कलाकार जाग्यावर असल्याने आणखी अशा कलाकृती निर्माण करू, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com