Justice Devendra Kumar Upadhyaya
Justice Devendra Kumar UpadhyayaSaam tv

Justice Devendra Kumar Upadhyaya: मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? जाणून घ्या त्यांची कारकिर्द

Justice Devendra Kumar Upadhyaya: न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.
Published on

Justice Devendra Kumar Upadhyaya News: अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी (दि. २९ जुलै) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायाधीश उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. (Latest Marathi News)

शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, न्या. उपाध्याय यांचे कुटुंबिय, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवाधिकार आयुक्त न्या. के के तातेड, राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान, मुंबई व अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश व वकील उपस्थित होते.

Justice Devendra Kumar Upadhyaya
Uddhav Thackeray News: दर आठवड्याला एक माणूस फोडा, उद्धव ठाकरेंचे भाजप-शिंदे सरकरला टोमणे आणि सल्ले; वाचा काय म्हणाले?

सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी न्या. उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीत व राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Justice Devendra Kumar Upadhyaya
Sambhaji Bhide News: आता संभाजी भिंडेंना शिक्षा करणार का? काँग्रेसचा गृहमंत्र्यांना सवाल

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा जन्म दिनांक १६ जून १९६५ रोजी झाला. न्या. उपाध्याय यांनी १९९१ मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि ११ मे १९९१ रोजी वकील म्हणून नोंदणी केली.

त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात नागरी आणि घटनात्मक बाजूने कामकाज पहिले. दिनांक २१ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांना अतिरिक्त न्यायाधीश पदावर बढती मिळाली आणि ६ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com