Live maggots found in dhokla sold at a sweet shop in Yavatmal, raising serious food safety concerns Saam Tv
महाराष्ट्र

बापरे! महिला पोलीस हवालदारानं मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोकळा आणला, पाहुणे-राहुणे खाणार तेवढ्यात...

Live Maggots Found In Dhokla In Yavatmal: यवतमाळ शहरातील एका स्वीट मार्टमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या ढोकळ्यांमध्ये जिवंत आळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Omkar Sonawane

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौकातील एका स्वीट मार्टमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या ढोकळ्यांमध्ये जिवंत आळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दरम्यान या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून हा एक प्रकारे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा आणि किसळवाणी प्रकार असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यवतमाळ पोलीस दलातील हवालदार मंजुळा किशोर भगत यांच्या लहान बहिणीचा वाढदिवस असल्याने ढोकळे स्वीट मार्टमधून खरेदी केले. ढोकळ्याचे सेवन करतांना त्यात प्रत्यक्षपणे अळी आढळून आली. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. भविष्यात शहरात अशाप्रकारे नागरिकांच्या आरोग्याची खेळ होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा विभागाने विशेष तपास मोहीम राबवावी अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान दुर्घटनेत निधन झाल्याने संपुर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. यानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक कामकाज वगळता इतर काम बंद राहणार आहे. राज्यात अजित दादांना मानणारा मोठा वर्ग होता.

कालपासून सोशल मीडियावर सर्वांच्याच स्टेटसला अजित पवारांचा फोटो दिसतो आहे. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांनी स्वतः हून बंद पुकारून दु:खात सहभागी झाले आहे. अशातच यवतमाळच्या ढाणकी शहरात बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून अजितदादा पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT