जिल्हा परिषद निवडणुकीचे वेळापत्रक बदललं, मतदान कधी? मतमोजणी कधी? वाचा नव्या तारखा

Maharashtra Zilla Parishad Panchayat Samiti Election Schedule 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.
Election officials prepare for rescheduled Zilla Parishad and Panchayat Samiti polls in Maharashtra following the state mourning period.
Election officials prepare for rescheduled Zilla Parishad and Panchayat Samiti polls in Maharashtra following the state mourning period.Saam Tv
Published On

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा आणि त्यांअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार आहे. तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

Election officials prepare for rescheduled Zilla Parishad and Panchayat Samiti polls in Maharashtra following the state mourning period.
अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? नेमकी कारणं येणार समोर, ब्लॅक बॉक्स सापडला

सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे सरकारने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहे.

Election officials prepare for rescheduled Zilla Parishad and Panchayat Samiti polls in Maharashtra following the state mourning period.
Ajit Pawar Plane Crash:...तर असं काही घडलंच नसतं; २७ वर्षे अजितदादांसोबत असलेल्या ड्रायव्हरनं सांगितला तो अखेरचा संवाद

त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचार 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता संपेल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com