Crime News: ट्रॅव्हल्स अडवून काँग्रेसच्या नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी; समृध्दी महामार्गावरील घटना

Congress Corporator Threatened on Samruddhi Highway: समृद्धी एक्सप्रेस वेवर एका ट्रॅव्हल बसमधून प्रवास करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना घडलीय. बस थांबवून नगरसेवकाला धमकवण्यात आलंय.
Congress Corporator Threatened on Samruddhi Highway
CONGRESS CORPORATOR THREATENED WITH DEATH ON SAMRUDDHI EXPRESSWAYsaamtv
Published On
Summary
  • समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स अडवून नगरसेवकाला धमकी देण्यात आलीय.

  • चंद्रपूरच्या काँग्रेस नगरसेवक राजेश अडूर यांना धमकी देण्यात आलीय.

  • चंद्रपूर महापालिकेत महापौर पदासाठी तीव्र राजकीय संघर्ष सुरूय

चेतन व्यास, साम प्रतिनिधी

चंद्रपुरात राजकारणासाठी दादागिरीचा खेळ सुरू झालाय. महापालिकेत महापौरसाठी चढाओढ सुरू असतानाचा नगरसेवकांना दमदाटी केली जातोय. महामार्गावर ट्रॅव्हल्स थांबवून चंद्रपूरच्या काँग्रेस नगरसेवकाला जीव मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना वर्ध्यातील समृध्दी महामार्गावर घडलीय आहे. महापालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाहीये. यामुळे महापौर पदासाठी चढाओढ सुरू आहे. त्याचदरम्यान येथे गुंडगिरी, दहशत माजवण्याचं काम सुरू झालंय.

Congress Corporator Threatened on Samruddhi Highway
Maharashtra Budget: अजित पवारांनंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? या नेत्याकडे धुरा जाण्याची शक्यता

पुण्यावरून नागपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स समृध्दी महामार्गावरील गणेशपूर शिवारात अडवून चंद्रपूर येथील नगरसेवक, त्यांची पत्नी, इतर नगरसेवक व मित्रांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडलीय. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. राजेश मुरली अडूर (३७), असे तक्रारकर्ता नगरसेवकांचे नाव आहे. राजेश अडुर हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत.

Congress Corporator Threatened on Samruddhi Highway
Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

राजेश अडूर त्यांची पत्नी अश्विनी, नगरसेवक मित्र सचिन कत्याल, सोफीया खान, अब्दुल करीम शेख, वसंता देशमुख, करिष्मा जंगम आणि इतर नगरसेवक पुण्यावरून ट्रॅव्हल्सने (क्र. एम.एच. ४०/सी.पी. ९९२४) समृध्दी महामार्गाने नागपूरवरून चंद्रपूरकडे जात होते. त्यावेळी चार ते पाच खासगी वाहनांनी आलेल्या आरोपींनी गणेशपूर शिवारात त्यांची ट्रॅव्हल्स रोखली. त्यापैकी कार (क्र. एम.एच. ३२/वाय १०३४), कार (क्र. एम.एच. ४०/के. आर. ८९७९) आणि कार (क्र. ६८०८) हे क्रमांक राजेश यांनी बघितले.

Congress Corporator Threatened on Samruddhi Highway
Maharashtra Politics: ऐन ZP निवडणुकीत ठाकरे सेनेला मोठा धक्का; माजी आमदाराने पक्ष सोडला, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

रस्ता अडविल्याने ट्रॅव्हल्स चालकाने वाहन थांबविले. आरोपींच्या वाहनातून सौरभ अरूण ठोंबरे, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर आणि इतर १० ते १५ जण उतरले. सौरभ ठोंबरे हा ‘आमच्या सोबत चला’, असे सांगत होता. राजेश अडूर यांनी कशाकरिता सोबत चला, असे विचारले असता त्याने ‘सोहेलभाई शेख इनसे बात करलो’, असे सांगितले. त्यानंतर सर्व आरोपींनी अडूर यांच्याशी वाद घातला. शिवीगाळ केली. सोबत आले नाही, तर मारून टाकेल, अशी धमकी दिल्याची सावंगी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आलीय.

वादानंतर राजेश अडूर व सहकारी ओरडले असता ते सर्व जण वाहने घेउन पळून गेले. त्यापैकी एकाला अडूर व सहकाऱ्यांनी पकडून ठेवले. त्याने आपले नाव कॉनेन शमीम सिद्धीकी (२१), रा. इंदिरानगर, घुग्गुस, जि. चंद्रपूर, ह.मु. खापरखेडा, नागपूर, असे सांगितले. त्याने मुजम्मौल खान, रा. मोमीनपुरा, नागपूर, जासीम खान, रा. मानकापूर, आलोक रोहीदास, रा. अजनी, नागपूर, अदनान शेख, रा. मानकापूर, नागपूर, सौरभ, रा. मानकापूर हे सोबत आले होते, असेही सांगितले.

नंतर अडूर यांनी पोलिसांना माहिती दिली. लगेच सावंगी पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजेश अडूर यांनी सावंगी पोलिस ठाण्यात याप्रकरणी सौरभ ठोंंबरे, कॉनेन शमीम सिद्धीकी यांच्यासह इतर १० ते १५ साथीदारांविरुध्द तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी भरतीय न्याय संहिता कलम १२६ (२), १८९ (२), १९०, ३५१ (३), ३५२ नुसार गुन्हा नोंद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com