amravati, sarpanch saam tv
महाराष्ट्र

चर्चा तर हाेणारच ! गावात दारुबंदी अन् सरपंचांच्या घरी सापडल्या 'देशी' च्या बाटल्या

या पुढील कार्यवाही चांदूर रेल्वेचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Amravati Cime News : गावात दारूबंदी असतानाही चक्क सरपंचाच्या घरात देशी दारू आढळल्यानं एकच खळबळ उडाली. ही घटना अमरावती (amravati) जिल्ह्यतील चांदुर रेल्वे तालुक्यातील सांवगी मग्रारापूर या गावात घडली. या घटनेची सखाेल चाैकशी चांदूर रेल्वेचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस (police) करीत आहेत.

खब-याने दिलेल्या माहितीनंतर चांदूर रेल्वे पोलिसांनी धाड टाकून सरपंच यांच्या घरातून नऊ हजार दाेनशे रूपयांच्या किंमतीची देशी दारूच्या २३० बाटल्या जप्त केल्या. चांदूर रेल्वे पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत सरपंच यांच्या घराच्या कोपऱ्यातून पलंगाखाली गोल्डन संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या ९ हजार २०० रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या सापडल्या.

या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी सरपंच यांचे पती राजु शंकर सुर्यवंशी (वय ४०) यांना समजपत्र देवून सोडण्यात आले. या पुढील कार्यवाही चांदूर रेल्वेचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT