Sangli News : संजय भाट खूनप्रकरणी अहिल्यानगरातील तिघांना जन्मठेप

न्यायालयात सुनावणी वेळे सरकारी पक्षातर्फे 15 साक्षीदार तपासले.
Sangli, Sangli Court, Sangli Police
Sangli, Sangli Court, Sangli PoliceSaam Tv

Sangli News : पूर्व वैमानस्यातून सांगली येथील अहिल्यानगर येथे संजय भाट याचा खून केल्याबद्दल संशयित आरोपी अशोक वसंत पाटील, प्रकाश उर्फ अण्णा बाबा गवळी, अमित प्रकाश कांबळे (सर्व राहणार अहिल्यानगर) यांना न्यायालयानं (court) जन्मठेपेची आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी हा खटला चालवला.

अशोक पाटील याची पत्नी आणि मृत संजय भाट यांच्यात संबंध असल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दहा वर्षांपूर्वी पाटीलने दिली होती. त्यावेळी ते प्रकरण पाटीलनं एक लाख रुपये घेऊन मिटवले होते. तेव्हापासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. संजय भाट याचा मित्र सुनील कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर चौकात मोठे डिजिटल पोस्टर लावले होते.

Sangli, Sangli Court, Sangli Police
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून युवकांच्या दाेन टाेळ्या वर्षासाठी तडीपार

त्यावर संजय भाट याचे छायाचित्र होते. 27 नोव्हेंबर 2015 रोजी संजय भाट यांच्या फोटोत गळ्याभोवती ब्लेडने फाडण्यात आले होते. अशोक पाटील याने पोस्टर फाडले या कारणावरून दुपारी भाट आणि अशोक पाटील यांच्यात भांडण झाले. त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास भाट आणि त्यांचा मित्र दुचाकी वरून अहिल्यानगर येथे आले. तेव्हा तेथे आलेल्या तिघांनी दुचाकीवरून भाटला खाली पाडून डोक्यात आणि मानेवर शरीरावर 24 ठिकाणी तलवार, कोयता, गुप्ती याने वार केले.

Sangli, Sangli Court, Sangli Police
Shirdi : आंदाेलकांना सुरक्षा रक्षकांनी घेरलं; साई बाबा मंदिर परिसरात तणावाचं वातावरण (पाहा व्हिडिओ)

हल्ल्यानंतर भाट यांच्या बहिणीचा पती संजय कुमार पाटील घटनास्थळी आले. त्यांनी जखमी भाट यांना रिक्षा मधून घालून सिव्हिल हॉस्पिटलला नेत असताना भाट यांनी संजय कुमार व रिक्षांमधील शकील मुल्ला यांच्यासमोर तिघांनी तलवार कोयता व गुप्तीने वार केल्याची वस्तुस्थिती सांगितली.त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल जवळ पोहोचले असता भाट याचा मृत्यू झाला.

Sangli, Sangli Court, Sangli Police
Shridi : साईबाबा संस्थानची आज बैठक; शेतकरी, व्यवसायिकांसह भाविकांचं निर्णयावर लक्ष

या प्रकरणी संजय कुमार पाटील यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. न्यायालयात सुनावणी वेळे सरकारी पक्षातर्फे 15 साक्षीदार तपासले. प्रत्ययदर्शी साक्षीदार विजय शिंदे आणि अनिल आवटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

Sangli, Sangli Court, Sangli Police
Sangli Swine Flu : सांगलीकरांनाे घाबरु नका ! स्वाइन फ्लूवर नियंत्रणासाठी आराेग्य विभाग सज्ज

फिर्यादी संजय कुमार पाटील आणि शकील मुल्ला यांच्यासमोर झालेल्या मृत्यू पूर्व जबाब हा महत्त्वाचा पुरावा ठरला. सिव्हील हॉस्पिटलचे डॉक्टर यांची साक्षी महत्वाची ठरली. साक्ष आणि पुराव्याच्या आधारे न्यायालयानं तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Sangli, Sangli Court, Sangli Police
Ganesh Utsav 2022 : गणेशाेत्सव मंडळांसाठी आनंदाची बातमी; सांगलीत झाला महत्वपुर्ण निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com