Ganesh Utsav 2022 : गणेशाेत्सव मंडळांसाठी आनंदाची बातमी; सांगलीत झाला महत्वपुर्ण निर्णय

महापालिकेच्या या निर्णयामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला असून गणेश मंडळांनी प्रशासनाचे आभार मानलेत.
sangli, Ganesh Mandal, Ganesh Utsav 2022, Ganesh Utsav
sangli, Ganesh Mandal, Ganesh Utsav 2022, Ganesh Utsavsaam tv

Sangli Ganesh Utsav 2022 : कोरोना काळानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त होत असणाऱ्या गणेशोत्सवासाठी (Ganesh Utsav) सांगली महापालिका प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केली आहे. यावेळी मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत गणेश मंडळ आणि नगरसेवक, पदाधिकारी यांच्या मागणीनूसार गणेश मंडळांकडून प्रतिदिन आकारणी करण्यात येणाऱ्या फीमध्ये सवलत देत प्रति चौरस मीटर दहा रुपये आणि प्रति खड्डा पन्नास रुपये प्रमाणे एकदाच आकारणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त सुनील पवार यांनी घेतला. सांगली महापालिकेच्या (sangli) या निर्णयामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येत्या 31 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या आढावा बैठकीत पोलीस, महापालिका अधिकारी नगरसेवक आणि सांगली शहरातील गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

sangli, Ganesh Mandal, Ganesh Utsav 2022, Ganesh Utsav
Passenger Train : बेळगाव, मिरज प्रवाशांसाठी खूषखबर; उद्यापासून धावणार तीन पॅसेंजर रेल्वे

प्रारंभी महापालिकेकडून गणेशोत्सवबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती सर्वाना दिली. तसेच मंडप स्टेज उभारणी तसेच स्वागत कमान उभारणी बाबत महापालिकेने विकसित केलेल्या ऍपची माहितीही सर्वाना देत परवानगी प्रक्रिया सांगण्यात आली. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डे मुक्त करण्याबरोबर विसर्जन मार्गबाबत सर्व ती व्यवस्था महापालिका प्रशासनाने केली आहे.

sangli, Ganesh Mandal, Ganesh Utsav 2022, Ganesh Utsav
Ganpati : बाप्पांच्या डाेळ्यातून येऊ लागले अश्रू, भाविकांची अलाेट गर्दी; अफवांवर विश्वासू ठेवू नका : अंनिस (पाहा व्हिडिओ)

नागरिकांच्या सोयीसाठी 13 ठिकाणी कृत्रिम तलाव तसेच निर्माल्य संकलन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. याचबरोबर श्री आगमन आणि विसर्जन मार्गावर एलईडीची व्यवस्था करण्यात येणार आहे. उत्सव काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही याबाबत वीज मंडळाला नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच मिरवणूक मार्गावर रस्त्यावर धोकादायक स्थितीत असलेली झाडांच्या फांद्या काढून घेणेची कारवाही सुरू करण्यात आली आहे.

sangli, Ganesh Mandal, Ganesh Utsav 2022, Ganesh Utsav
मोठी बातमी! अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्याला पोलिसांकडून परवानगी

सांगलीच्या सरकारी घाटावर मूर्तीदान केंद उभारण्यात येणार असून यामध्ये मूर्तीदान करणाऱ्या नागरिकांना मनपाकडून प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात येणार आहे. दीड दिवसाच्या विसर्जनापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मनपाकडून स्वच्छ सर्व्हेक्षणबाबत तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी पर्यावरणपूरक आणि आनंदी वातावरणात साजरा करावा तसेच कोरोना नियमांचेही सर्वांनी पालन करावे असे आवाहन केले.

sangli, Ganesh Mandal, Ganesh Utsav 2022, Ganesh Utsav
विधानभवना बाहेर राडा ! 'सामान्य जनता काॅलर पकडून तुम्हांला रस्त्यावर मारेल, लक्षात ठेवा'

गणेश मंडळांसाठी 10 रुपये प्रति चौरसफूटप्रमाणे मंडप स्टेज आकारणी तसेच 50 रुपयेप्रमाणे प्रतिखड्डे आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडप स्टेज आकारणी प्रतिदिवस ऐवजी 10 रुपये प्रमाणे एकदाच भरून घेतली जाईल. महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी गणेश मंडळ आणि नगरसेवक यांच्या मागणी आणि विनंतीनुसार मंडप स्टेज परवाना करणी शुल्कात सवलत देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट केले. सर्वांनी महापालिकेच्या गणेशोत्सव परवानगी ऍपचा वापर करून सुलभतेने परवानगी उपलब्ध करून घ्यावी असे आवाहनही महापौर सुर्यवंशी यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

sangli, Ganesh Mandal, Ganesh Utsav 2022, Ganesh Utsav
Crime News : लागोपाठ दोन मुली झाल्यानं पत्नीवर प्राणघातक हल्ला; पती पाेलिसांत हजर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com