leopard, nashik news saam tv
महाराष्ट्र

Nashik News : पिंज-यातील बिबट्याला पाहण्यासाठी नानेगाव परिसरात नागरिकांची उडाली झुंबड

Leopard : बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी गावात वा-या सारखी पसरली.

अभिजीत सोनावणे

Nashik News : देवळाली कॅम्प भागातील नानेगाव परिसरात वन विभागाच्या पिंजऱ्यात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. (Maharashtra News)

गेल्या काही दिवसांपासून नाशिक तालुक्यातील नानेगाव परिसरात दहशत माजवणारा बिबट्या आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी समजताच बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

नाणेगाव आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच वारंवार दिसून आले होत. 2 ऑक्टोबरला लॅमरोड रोड भागातील बालगृह रोडवर बिबट्या बांधकाम साइटवरील शेडमध्ये दिसून आला होता. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

त्यांनतर वनविभागाकडून परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटे पाचच्या सुमारास नानेगावच्या भवानी नगर परिसरातील मनाजी शिंदे यांच्या शेतातील घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी (citizens) सुटकेचा निःश्वास सोडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rabdi Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली? घरीच बनवा मलाईदार आणि स्वादिष्ट रबडी; वाचा सोपी रेसिपी

Diet : तंदुरुस्त राहण्यासाठी फॉलो करा 'प्लांट बेस डाएट', शरीरात होतील 'हे' ६ फायदे

Tharla tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत सर्वात मोठा ट्विस्ट! ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सायलीला होणार अटक

Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर; शित्रणमंत्रालयाची सूत्रे आता या दिग्गज नेत्याकडे

Pune Tourism : पुण्याचं विहंगम दृश्य पाहायचंय? मग 'हे' ठिकाण रिमझिम पावसात नक्की फिरा

SCROLL FOR NEXT