Solapur News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! हुतात्मा एक्सप्रेस, इंटरसिटी रद्द; जाणून घ्या कारण

प्रवाशांनी बदलाची नाेंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Train
TrainSaam TV
Published On

Central Railway News : रेल्वेच्या विविध कामांसाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे आजची (मंगळवार) हुतात्मा एक्सप्रेस (hutatma express) आणि इंटरसिटी (intercity train) या सोलापूरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे ट्विट रेल्वेने केले आहे. (Maharashtra News)

Train
Satara News : सातारा एलसीबीची माेठी कारवाई, 47 लाखांचा गुटखा पकडला, ट्रकही जप्त

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असलेल्या पाटस-दौंड विभागात रेल्वे रूळ, सिग्नल आणि अन्य अभियांत्रिकी संदर्भातील कामासाठी रेल्वेने १५ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. या मेगाब्लॉकमुळे आजची हुतात्मा एक्सप्रेस आणि इंटरसिटी या सोलापूरसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दोन रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत.

Train
Raju Shetti : 'स्वाभिमानी' चा साखर कारखानदारांच्या विराेधात ढाेल बजाओ, राजू शेट्टींची पुढच्या आंदाेलनाची दिशा स्पष्ट

यामुळे एसटी बस अन् ट्रॅव्हल्स गाड्यांवर भार वाढला आहे. या मेगाब्लॉकमुळे ८ पॅसेंजर आणि ४ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगाब्लॉकमुळे बंगलोर - मुंबई उद्यान एक्स्प्रेस सुमारे २ तास ५० मिनिटे उशिराने सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे.

हडपसरहून सुटणारी हडपसर - हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी हडपसर ऐवजी दौंड येथून हैदराबादसाठी सोडण्यात येणार आहे. तरी प्रवाशांनी बदलाची नाेंद घेऊन रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com