Laxman Hake On CM Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Laxman Hake: आम्हाला XXXया समजतात का?, मुख्यमंत्र्यांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली

Laxman Hake On CM Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली. ओबीसींना जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Priya More

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली. ओबीसींना जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही असा आरोप करत त्यांनी तुम्ही आम्हाला XXXया समजता का? अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याचा हा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

परळीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. ओबीसींना जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही असा आरोप त्यांनी केला. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसहित सर्व पक्षांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला.

काही दिवसांपासून लक्ष्मण हाके उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकेरी भाषेत उल्लेख करत टार्गेट करताना पाहायला मिळतात. आज देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. मात्र अजित पवार यांच्याबरोबरच लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही टीका केली.

मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना मात्र लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली. मुख्यमंत्र्यांनी सर्व ओबीसी नेत्यांची बैठक बोलवावी अशी मागणी यावेळी हाके यांनी केली. ओबीसींच्या प्रश्नावर ओबीसी आमदार आणि मंत्री गप्प बसतात अशी देखील टीका त्यांनी यावेळी केली. दरम्यान, ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी जालन्याच्या वडीगोद्री येथे उपोषण केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते ओबीसी आरक्षणासाठी उपोषण देखील करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT