Maharashtra Politics: शिवसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत; मनसेचा कोकणातील बुरूज ढासळणार?

Vaibhav Khedekar: शिवसेना नेते रामदास कदम राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे. कोकणातील मनसे नेते वैभव खेडेकर यांचा प्रवेश करून घेणार आहेत.
Konkan Politics
Vaibhav Khedekar
Published On

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा आहे. त्याचदरम्यान शिंदेंची शिवसेना मनसेला धक्का देण्याच्या तयारीत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर हे पक्षात नाराज असून ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. खेडेकर शिवसेनेत गेल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकणातील बुरुज ढासळणार असल्याची चर्चा आहे. (MNS Leader Vaibhav Khedekar)

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव खेडेकर मनसेमध्ये नाराज आहेत, त्यामुळे ते वेगळा विचार करतील अशी चर्चा आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी रत्नागिरीतील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि उदय सामंत यांनी वैभव खेडेकर यांना जाहीरपणे पक्षात घेण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर वैभव खेडेकर यांची नाराजी चर्चेत आली होती.

Konkan Politics
Maharashtra Politics : महायुतीचा वाद चिघळला, राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शिंदेसेनेच्या शिलेदारांची मुघलांच्या वंशजांशी तुलना

याआधी पुण्यातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी मनसेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडला होता. त्यानंतर आता वैभव खेडेकर यांनीही राज ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जुन्या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला जात नसल्याची खंत वैभव खेडेकर यांनी व्यक्त केलीय.

वैभव खेडेकरांच्या नाराजीमुळे दापोली खेडमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खेडेकर यांचा व्हॉट्स अँप स्टेटसनेही राजकीय वर्तुळात चर्चा घडवली होती. खेडेकर यांनी 'जय महाराष्ट्र', असं स्टेटस ठेवलं होतं. वैभव खेडेकर यांच्या नाराजी नाट्यामुळे मनसे समोर कोकणात आव्हान निर्माण होणार आहे

रत्नागिरीच्या चिंचघर येथील कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते रामदास कदम, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत , मंत्री योगेश कदम ,माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे वैभव खेडेकर एका व्यासपीठावर होते. त्यावेळी रामदास कदम यांनी आपल्या भाषणात बोलताना, वैभव खेडेकर यांना राज ठाकरेंकडे मीच घेऊन गेलो होतो. वैभव खेडेकर यांचा राजकीय गुरू मीच आहे. आपण एका कुटुंबातली माणसं आहोत, पुढे काय करायचं हे त्यांना माहिती आहे. 'समजने वाले को इशारा काफी है, असे सांगत रामदास कदम यांनी वैभव खेडेकरांना शिंदे गटात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com