Winter Health : हिवाळ्यात रोज खा मेथी-सुंठाचा १ लाडू! शरीराला मिळेल ऊर्जा, जाणून घ्या रेसिपी

Saam Tv

मेथी-सुंठ लाडू

शरीराला मिळेल ऊब आणि ऊर्जा जाणून घ्या पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी

Methi Sunth Ladoo | pinterest

हिवाळ्यासाठी खास पदार्थ

थंडीच्या दिवसांत मेथी, सुंठ आणि सुकामेव्यापासून तयार केलेले लाडू खाण्याची परंपरा आहे. चविष्ट असण्यासोबतच हे लाडू शरीराला ऊर्जा देणारे ठरू शकतात.

Methi Sunth Ladoo | pinterest

साहित्य

गव्हाचे पीठ, बेसन, तूप, गूळ, मेथीदाणे, सुंठ पावडर, हळद आणि आले पावडर, काळी मिरी पूड, मीठ, आवडीनुसार सुकामेवा

Methi Sunth Ladoo | pinterest

मेथीदाणे भाजून घ्या

एका कढईत मेथीदाणे मंद आचेवर भाजून घ्या. त्यातून छान सुगंध येऊ लागल्यानंतर गॅस बंद करा. मेथीदाणे थंड झाल्यावर त्यांची जाडसर पूड तयार करा.

Methi Sunth Ladoo | pinterest

गव्हाचे पीठ आणि बेसन भाजून घ्या

कढईत तूप गरम करून त्यात गव्हाचे पीठ आणि बेसन घाला. मंद आचेवर मिश्रण सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे लाडूंना छान चव आणि सुगंध येतो.

Methi Sunth Ladoo | pinterest

मसाले आणि गुळाचा पाक मिसळा

भाजलेल्या पिठात सुकामेवा, मेथी पूड, सुंठ पावडर, हळद, आले पावडर, काळी मिरी पूड आणि मीठ घाला. दुसऱ्या भांड्यात गूळ आणि अर्धा कप पाणी घालून एकतारी पाक तयार करा.

Methi Sunth Ladoo | pinterest

असे वळा चविष्ट लाडू

तयार गुळाचा पाक भाजलेल्या पिठाच्या मिश्रणात घालून व्यवस्थित एकजीव करा. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर हाताने गोल लाडू वळा.

Methi Sunth Ladoo | pinterest

थंडीत पौष्टिक पर्याय

तयार लाडू हवाबंद डब्यात साठवून ठेवा. मेथी आणि सुंठीच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे हे लाडू हिवाळ्यात खाण्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. मात्र, गूळ आणि तुपाचे प्रमाण लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणातच सेवन करा.

Methi Sunth Ladoo | pinterest

NEXT : बाजारातील पापडी विसरा! गव्हाच्या पिठापासून बनवा कुरकुरीत मसाला पापडी, चहासोबत लागेल भारी

How to Make Crunchy Whole Wheat Masala Papdi at Home | saam tv
येथे क्लिक करा