Latur : खड्ड्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाला आले, तलावाचे स्वरुप
Latur : खड्ड्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाला आले, तलावाचे स्वरुप दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

Latur : खड्ड्यांमुळे राष्ट्रीय महामार्गाला आले, तलावाचे स्वरुप

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पानगांव येथुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.३६१ एच वर संभाजी चौक ते वैभव बिअर बार दरम्यान रस्त्यावर ५ मिनीट पडलेल्या पावसाने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने राष्ट्रीय महामार्गाला तलावाचे स्वरुप आले आहे. या महामार्गाच्या निर्मितीला लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाची उदासिनता कारणीभुत आहे.

अश्या खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहन धारकांची त्रेधापीठ उडत असुन व्यापारी, प्रवाशी आणि गावकऱ्यांचा मात्र जीव टांगणीला लागला आहे. उमरगा ते खामगांव राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ एच हा २०१८ ला मंजुर करण्यात आला. एका बाजुने उमरगा ते खरोळा फाट्यापर्यंत तर दुसऱ्या बाजुने धर्मापुरी कडुन येणारा पानगांव रेल्वेगेट पर्यंत रस्ता पुर्णत्वास आला आहे.

हे देखील पहा-

पानगांव रेल्वे गेट पासुन ते खरोळा फाटा दरम्यानचा केवळ १४ कि.मी इतकाच रस्ता शेतकऱ्यांच्या मावेजाचे कारणपुढे करत महामार्ग विभागाने रस्ता निर्मितीचे काम करण्याचे थांबविले आहे. सन २०१८ ला राज्य महामार्ग विभागाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाला वर्ग केल्यामुळे मागील २ वर्षापासुन या रस्त्याचे मजबुतीकरण होवु शकले नाही. त्यामुळे खरोळा फाटा ते पानगांव दरम्यानच्या रस्त्याची चाळन झाली आहे.

जागोजागी मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. सदरील राष्ट्रीय महामार्ग पानगाव शहरामधुन जात असल्याने अण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वेगेट दरम्यान रस्त्यावर कमरे इतके मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. अगोदरच पडलेले खड्डे आणि पडत असलेल्या पावसाने वाहन धारकांना खड्यातील पाण्याचा आणि चिखलाचा अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकी वाहनधारक या रस्त्यावर घसरुन पडत आहेत.

पायी चालणारा व्यक्ती या रस्त्यावरुन चालुच शकत नसल्याने याचा परीणाम पानगाव मधील व्यापारावर होत आहे. किमान पानगाव शहराअंतर्गत येणारा आण्णाभाऊ साठे चौक ते रेल्वेगेट पर्यंतचा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी पानगावकरांच्या वतीने अनेकवेळा निवेदने, आंदोलने करून केली आहेत. परंतु याकडे ना लोकप्रतिनिधींनी ना महामार्ग विभागाने लक्ष दिले नागरिकांचा संताप पाहून, अंदोलनापुरते केवळ रस्त्याची थातुर- मातुर डागडुजी केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Harshali Malhotra: 'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी आयुष्याच्या टर्निंग पॉइंटलाच ठरली यशस्वी

Chandrapur: वाघाच्या हल्ल्यात युवा शेतक-याचा मृत्यू, ग्रामस्थांचे प्रशासनाविराेधात आंदाेलन

Pune News : शेकडो कोटींचा बँक घोटाळा, १७ वर्षांपासून वेषांतर करून चकवा; CID च्या जाळ्यात अडकला मोठा मासा

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील ९० टक्के होर्डिंग धोकादायक; मनपाने दिलेल्या नोटीसला एजन्सीचा ठेंगा

White Hair Solution : कोळशासारखे काळेभोर केस हवेत? 'या'टीप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT