नागपूर : सराफा बाजारमध्ये २२ सप्टेंबरला सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या भावामध्ये ३७० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. ४७,७३०.० रुपये प्रति १० ग्राम पातळीवर पोहचला आहे. तर २१ सप्टेंबरला हा भाव ४७३६० रुपयांवर थांबला होता. चांदीचा दर ८५० रुपयांनी वाढला आहे.
हे देखील पहा-
६१८६० रुपये प्रतिकिलोग्रॅमवर पोहचला आहे. शेवटचा भाव ६१०१०.० रुपये प्रतिकिलोग्रॅम होता. दागिने खरेदी करताना हॉलमार्क व्यवस्थित तपासून घ्यावे. दुकानदारकडून खरेदी केलेले दागिने तेवढया कॅरेटचेच आहेत. याची गँरटी हॉलमार्कमुळे मिळते. हॉलमार्किंग हे भारतीय मानक ब्यूरो अधिनियमानुसार ठरवले आहे. भारत आपले बहुतेक सोने परदेशातून आयात करतो.
यामुळे जगभरातील घडामोडी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातील चढ- उतारांचा परिणाम सोन्या -चांदीच्या भावावर होतो. भारत हा जगातील सर्वात मोठा सोने आयात करणारा देश आहे. सोन्याची मागणी पुर्ण करण्याकरिता विदेशांमधून मोठ्या प्रमाणात सोने मागवले जाते. भारत वर्षभरता साधारण ८००- ९०० टन सोने आयात करत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.