LATUR ENGINEER HANUMANT PATIL DIES BY SUICIDE IN LONDON, FAMILY CITES MENTAL STRESS AND DOMESTIC DISPUTE Saam tv
महाराष्ट्र

Shocking : महाराष्ट्रातील इंजिनीयरची लंडनमध्ये आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

Latur Sucide News : लातूर जिल्ह्यातील हनुमंत पाटील या तरुण इंजिनीयरने लंडनमध्ये राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Alisha Khedekar

  • लातूर जिल्ह्यातील हनुमंत पाटील यांनी लंडनमध्ये आत्महत्या केली

  • हनुमंत पाटील उच्चशिक्षित इंजिनीयर होते

  • मानसिक तणावामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा

  • मृतदेह भारतात आणून मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले

संदीप भोसले, लातूर

लातूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुण इंजिनीयरने लंडनमध्ये राहत्या घरात आत्महत्या केली आहे. या घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मानसिक तणावातून आणि घरगुती कारणातून त्याने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे अहमदपूर तालुक्यातील बोडका गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव हनुमंत पाटील असून तो गेल्या काही वर्षांपासून लंडन येथे नोकरीनिमित्त राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत पाटील हा उच्चशिक्षित इंजिनियर होता आणि चांगल्या करिअरच्या उद्देशाने तो परदेशात नोकरीसाठी स्थायिक झाला होता. तर आठ वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक मतभेद निर्माण झाल्याने दोघे वेगळे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पत्नीने हनुमंत पाटील यांच्या कुटुंबीयांविरोधात सुमारे दोन कोटी रुपयांचा दावा दाखल केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे हनुमंत पाटील हे मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा नातेवाईकांमध्ये सुरू आहे.

कौटुंबिक वाद, न्यायालयीन प्रक्रिया आणि वाढता मानसिक ताण यामुळे त्यांच्यावर मोठा परिणाम झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी हनुमंत पाटील यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी "मी आता जगणार नाही, माझी वाट पाहू नका," असे भावनिक शब्द उच्चारल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या आत्महत्येची माहिती समोर आली.

ही घटना समजताच बोडका गावावर शोककळा पसरली असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. परदेशात नोकरी करत असलेल्या एका होतकरू तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. दरम्यान, विमानाने त्यांचा मृतदेह पुणे येथे आणला आणि काल त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अग्रवाल कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर; केतनच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने आजोबांचेही निधन

साटम हसले, राज ठाकरे भडकले, आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतोय

खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप, उपचार नाकारल्यास 5 लाखांचा दंड

भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झालीच पाहिजे, अंबरनाथच्या उपनगराध्यक्षांकडून भ्रष्टाचाराचं समर्थन

दोन महिन्यात मिसिंग लिंकवर खड्डे, नागरिकांचा संताप, पहिल्याच पावसात मिसिंग लिंकवर खड्डे

SCROLL FOR NEXT