Manasvi Choudhary
वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक उपाय केले जातात. मात्र तुम्हाला माहितीये का? हेल्दी टी पिऊन तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने वजन कमी करू शकता.
जर तुम्हाला नियमितपणे चहा पिण्याची सवय असेल तर तुम्ही खालील ५ प्रकारचे चहा घरी ट्राय करा.
वजन कमी करण्याच्या चर्चेत ग्रीन टीचे नाव सर्वात वर येते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स (Catechins) असतात, जे शरीराचा मेटाबॉलिजम (Metabolism) वाढवतात आणि पोटाची चरबी झटपट बर्न करण्यास मदत करतात.
जिरे आणि ओवा एकत्र करून तुम्ही चहा प्यायल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हा चहा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो.
आल्याचा चहा शरीराचा मेटाबॉलिजम सुधारतो आणि लिंबूमध्ये असणारे व्हिटॅमिन सी फॅट बर्न करण्यास फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हा चहा प्या.
दालचिनीमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात. चहामध्ये दालचिनी टाकून प्यायल्या वजन कमी करण्यासाठी फायदा होतो.
जास्वंदीच्या फुलांपासून बनवलेला हा चहा शरीराची अतिरिक्त चरबी कमी करण्यास फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.