सातारा जिल्ह्यात आगामी गणेशोत्सवाच्या तयारीचा प्रशासनासोबत आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला असून, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. उत्सवात डॉल्बी वापरावर कोणतीही बंदी नसली, तरी ठरवून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून, लेझर लाईटमुळे डोळ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मोर्चाच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांशी केली चर्चा
त्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी देखील केली चर्चा
अमरावती जिल्ह्यातील सोनोरी गावात वाघाच्या हल्ल्यामध्ये पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू
आज सकाळी देखील याच वाघाने दोन बकऱ्याची सुद्धा केली होती शिकार
सोनोरी गावाच्या परिसरात वनविभागाची टीमत तळ ठोकून मात्र अजूनही वाघाला पकडण्यामध्ये अपयश
परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याण स्टेशनच्या एसी वेटिंग लाउंजमध्ये रेल्वे दक्षता विभागाची मोठी कारवाई
बेकायदेशीर स्वयंपाकासाठी विद्युत उपकरणे जप्त, अनधिकृत विक्रेत्याला आरपीएफकडे सोपवले
मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने कल्याण स्टेशनवरील ओरिजिन एसी वेटिंग लाउंजमध्ये तपासणी केली. तपासणीदरम्यान, स्टेशन परिसरात स्वयंपाकासाठी अनेक विद्युत उपकरणांचा वापर होत असल्याचे आढळून आले.
अंतरवाली सराटीच्या वेशीवर सुरू असलेल्या ओबीसी समाजाच्या आमरण उपोषणासाठी स्टेज उभारण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्याचबरोबर उपोषणाचे ठिकाण इतरत्र हलवावे, अशी विनंती पोलिसांनी आंदोलकांना केली आहे.ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटीच्या वेशीवर आमरण उपोषण सुरू आहे. या ठिकाणी उपोषणाचे स्टेज उभारण्याची तयारी आंदोलकांकडून करण्यात येत होती. मात्र, पोलिसांनी स्टेज उभारण्यास परवानगी नाकारत उपोषण अन्य ठिकाणी हलवण्याची विनंती केली.यावेळी आंदोलक ससाणे यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनोज जरांगे यांना एक न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का?असा सवाल त्यांनी केला. तसेच, प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर करण्याची शक्यता असल्याचा आरोपही ससाणे यांनी केला.
अहिल्यानगर जिल्हा भाजप कार्यकारणी बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गैरहजेरीवरून आमदार राम सातपुते यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सभापती राम शिंदे, आमदार राम सातपुते आणि जिल्हा प्रभारी भैरवी वाघ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, महापालिकेच्या नवनिर्वाचित २७ नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक बैठकीला गैरहजर राहिल्याने राम सातपुते यांनी भाषणातूनच नाराजी व्यक्त केली
धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस असून त्यांनी सलाईन आणि उपचार घेण्यास बंद केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे...
आज दुसऱ्यांदा धुळे सोलापूर महामार्गवर वडीगोद्री फाट्यासमोर मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग रोखून धरला आहे
या रास्ता रोको आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याच पाहायला मिळतंय
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सांगलीच्या येडे निपाणी फाट्याजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात दोन इनोव्हा कारची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ५ ते ६ जण जखमी झाल्याचे समजते.
बंजारा समाजाची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपणारा पारंपरिक बंजारा तीज उत्सव (गौरी) सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा रविवारी कल्याणमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीत आयोजित या सोहळ्यास बंजारा समाज बांधव भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पारंपरिक पद्धतीने तीज उत्सव साजरा करण्यात आला.
* पार्किंगमधून कार बाहेर काढताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
* अनियंत्रित कारने रस्त्यावरील ३ ते ४ वाहनांना धडक दिली.
* अपघातात ३ जण जखमी झाले.
* जखमींपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी आहे.
* अपघातात २ ते ३ वाहनांचे नुकसान झाले आहे.
* कारचालक ३१ वर्षांचा असून कुरळे येथे राहणारा असल्याची माहिती.
* चालक आपल्या आत्येभावाकडे आला होता. त्याच ठिकाणी कार पार्क केली जात होती.
* संबंधित कार चालकाच्या पत्नीच्या नावावर असल्याची माहिती.
* अपघातानंतर कारचालकाला कळवा पोलिसांनी ताब्यात घेतले.
* चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
* या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील क्लस्टर विकास योजनेवर आणि शहराच्या वाढत्या समस्यांवर वनमंत्री गणेश नाईक यांनी जोरदार टोला लगावला आहे. पुनर्विकास करताना नागरिकांना योग्य सोयी-सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
गणेश नाईक म्हणाले की, "दीड एफएसआय (FSI) मध्ये जिथे ३०० कुटुंबे व्यवस्थित राहू शकतात, तिथे अतिरिक्त एफएसआय देऊन हजारो लोकांची गर्दी करणे योग्य नाही. यामुळे भविष्यात नवी मुंबईकरांना पाणी, आरोग्य आणि शिक्षणाचा गंभीर तुटवडा जाणवेल."
माळशिरस तालुक्यातील लवंग येथे सुशीला भोसले या निराधार महिलेला "पाणी देता का?" असा बहाणा करून आलिशान कारमधून आलेल्या अनोळखी चोरट्यांनी तिच्या ७० ते ८० हजार रुपये किमतीच्या पाच शेळ्या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
धाराशिवच्या सारोळा गावात मराठा आंदोलकांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांना अडवलं
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचे गेली नऊ दिवसापासून आमरण उपोषण सुरू
धाराशिव मध्ये व्हेलेडीटी कार्यालयात एकच अधिकारी आहे,त्यांच्याकडे देखील तीन जिल्ह्यात काम आहे,त्यामुळे धाराशिव साठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याची मराठा आंदोलकांची मागणी
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सरकाराने दखल घ्यावी,मराठा आंदोलकांची आमदार राणाजगजितसिंह पाटलांकडे मागणी
अमरावती जिल्ह्याचं दुर्दैव आहे, शासन व प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही,
अमर जिल्ह्यात 1000 शेतकऱ्यांनी बोगस बियांच्या तक्रारी केल्या होत्या, त्याच काय झालं
पालकमंत्री बावनकुळे यांना प्रश्न विचारले तर ते असे बोलतात की आम्हाला काही कळतच नाही..
जिल्हा नियोजन मधून दुबार पेरणीसाठी पैसे देणार असं पालकपत्रांनी सांगितलं होतं मात्र ती अजूनही मिळाले नाही
कर्जमाफी केली ती खोटी खोटी कर्जमाफी,त्या कर्जमाफीचा फायदा कोणाला झाला तेही माहित नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच हे आजोळ आहे, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की नाही? फक्त खोटं बोल आणि रेटून बोल,कोणत्याच प्रॉब्लेम कडे त्यांचं लक्ष नाही, यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
शेतकऱ्यांकडे लक्ष द्या तुमचा धाक राहिला नाही,
माजलगाव तालुक्यातील वारोळा वस्ती परिसरातून जाणाऱ्या कॅनॉलमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कॅनॉलमधील मोटारीच्या पाईपलाईनला अडकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला असून, तो काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत होता. प्राथमिक माहितीनुसार, तलवाडा परिसराच्या दिशेने पाण्याच्या प्रवाहासोबत हा मृतदेह वाहत आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सत्ताधारी आमदार आणि मंत्रीच सरकारला पत्र देत असतील, तर काम मंजूर करून घेण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.
विरोधकांचे काम सरकारकडे मागण्या मांडणे आणि आवाज उठवणे हे आहे मात्र सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांनी कामे मंजूर करून घेणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे सोनवणे म्हणाले.
सरकारमध्ये बसलेले मंत्री आमदार आणि स्वतःला मोठे नेते म्हणवून घेणाऱ्या सर्वांनी या प्रश्नावर बोलले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
मी सरकारला पत्र दिलं असं सांगण्यात काय अर्थ आहे? मंत्रिमंडळ आहे, सत्ताधारी आमदार-खासदार यांना कामांसाठी पत्र देण्याची वेळ का येते? असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला.
शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी गणोर आदिवासी शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देऊन पाहणी केली.या भेटीदरम्यान त्यांनी आश्रमशाळेतील सोयी सुविधा,भोजन व्यवस्था आणि परिसराच्या स्वच्छतेचा आढावा घेतला.आमदार पाडवी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक अडचणी व समस्या जाणून घेतल्या.आश्रमशाळेतील गैरसोयी तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उत्तम सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.आमदारांच्या या अचानक भेटीमुळे प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली.
आष्टी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर पुन्हा भगदाड
शंभर कोटींचा पूल वर्षभरातच खचला - निकृष्ट कामाचा पर्दाफाश
गडचिरोलीत भ्रष्टाचाराचा बळी - शंभर कोटींच्या वैनगंगा पुलाला वर्षभरातच भगदाड
एप्रिलमध्ये पडलेल्या खड्ड्याची मलमपट्टी, दुसऱ्या ठिकाणी पुन्हा खड्डा - प्रवाशांच्या जीवाशी खेळ
गडचिरोली-चंद्रपूरला जोडणारा लाईफलाईन पूल धोक्यात - कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका, नागरिकांची मागणी
नाशिकच्या सातपूर परिसरातील जुगार अड्ड्यावर क्राइम युनिट-2 च्या पोलिसांनी छापा टाकून 49 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत 19 मोटारसायकली, 5 चारचाकी वाहने आणि 49 मोबाईल फोनसह 85 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अंतरवाली सराटीच्या वेशीवरील सोनिया नगर येथे ओबीसी आंदोलकांकडून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. मंगेश ससाणे, विठ्ठल तळेकर आणि सतीश कुलाल हे या उपोषणात सहभागी झाले आहेत. एकीकडे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असताना वेशीवर ओबीसींचे आंदोलन सुरू झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी खरिप हंगामातील पिके धोक्यात आली असून सोयाबीनच्या पिकाने माना टाकण्यास सुरुवात केली आहे. ऐन बहरात असलेल्या सोयाबीनला पावसाची गरज असताना पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पुण्यातील डीजेबाबत अनेक वर्षांपासून नियम व अटी लागू करून तो सुरू ठेवण्याची भूमिका मांडली जात आहे. विद्यानंद बापट यांनी डीजेबाबत मांडलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा असून, इतर धर्मीय उत्सव किंवा पालखीबाबत केलेल्या भूमिकेला मात्र विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
राज ठाकरेंचा ठाणे दौरा
राज ठाकरे DJवर बोलणार?
धर्माचा वाद नको...
देशात धर्माची झिंग आली आहे...
धर्माचा अभिमान हवा, मात्र झिंग नको...
८ सप्टेंबरला सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जळगाव–शिरसोली–म्हसावद मार्गावर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगचे काम सुरू असल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित होणार असून, काही मेमू गाड्या रद्द तर वंदे भारतसह काही एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी, सेनगाव, हिंगोली आणि औंढा तालुक्यांत महिनाभर पाऊस न झाल्याने सोयाबीन पिके सुकून करपली असून, अनेक शेतकरी नष्ट झालेल्या पिकांवर नांगर फिरवण्याच्या तयारीत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात पावसा अभावी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे या विदारक परिस्थितीचे शेतकऱ्यांच्या शेतातील चित्र पुढे आले आहे हिंगोलीच्या वसमत,कळमनुरी सेनगाव हिंगोली व औंढा तालुक्यातील जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन अक्षरशः नष्ट झाले आहे तर औंढा व वसमत तालुक्यातील वस्सा, मुडा कानड कौंसडी ऊकळी ऊंडेगाव परिसरात मागील महिनाभरापासून पाऊस न बरसल्याने सुकून गेलेल्या सोयाबीनवर शेतकरी नांगर फिरवण्याच्या तयारीत आहेत.
शासकीय मदत आणि सानुग्रह अनुदानाच्या वाटपात लाखो रुपयांचा अपहार करून गेली सहा महिने फरार असलेल्या महिला तलाठ्याला राहुरी पोलिसांनी जेरबंद केलयं.. मंगल रूपचंद गुसिंगे असे या आरोपीचे महिला तलाठ्याचे नाव आहे.. माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी असताना त्यांनी 2022-23 या कालावधीत 3 लाख 65 हजार 340 रुपयांचे अनुदान नियमबाह्य पद्धतीने वितरित केल्याचे चौकशीत समोर आले होते.. याप्रकरणी एप्रिल 2026 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.. जालना जिल्ह्यातही त्यांच्याशी संबंधित 12 लाख 24 हजार रुपयांच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले असून राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत..
पुण्यात आज लाऊड स्पीकर विरोधी पुणेकर मंचाचा मोर्चा
विद्यानंद बापट सहभागी होणार नाही विद्यानंद यांनी पोलिसांना दिली माहिती
विद्यानंद बापट यांच्या निवासस्थानावर पोलिसांचा बंदोबस्त
विद्यानंद बापट यांनी मोर्चामध्ये सामील न होण्याची माहिती पोलिसांना दिलीय
बालगंधर्व उत्सव महानगरपालिका असं निघणार आहे मोर्चा
चंद्रपूर पोलीस प्रशासन राबवत आहे अनोखा उपक्रम
प्रत्येक मंडळामागे नियुक्त करण्यात आला एक कॉन्स्टेबल
पालघर मधील रिलीफ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण.
जखमी गोविंदांच्या बिलाबाबत झालेल्या वादानंतर मारहाण .
शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल .
जालन्यातील परतूर पोलिसांचे अवैध दारूविक्रीवर छापे,
कारवाईत 76 हजारांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हे दाखल
कृष्णराज महाडिक नेमके काँग्रेसचे की भाजपचे?
खासदार धनंजय महाडिकांच्या विधानाने राजकीय गोंधळ!
मुख्यमंत्र्यांनी कृष्णराज महाडिकांना युवक काँग्रेसचे अध्यक्ष केल्याचा दावा
प्रत्यक्षात कृष्णराज महाडिक भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष!
दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवणारा चोरटा जेरबंद
दरोडा आणि वाहन चोरी पथक, युनिट-२ची कारवाई,आरोपीचा पाठलाग करून घेतले ताब्यात
स्वप्निल सतीश आहेर,पापडे वस्ती, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव
अमरावती शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरल आहे,
रात्री गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कपिलवस्तू नगर येथे विशाल मनोहर वय २० वर्ष या तरुणाची चाकूने निर्घुणपने हत्या करण्यात आली..
कपिलवस्तू नगर भागात अज्ञात हल्लेखोरांनी विशालच्या पायावर आणि मांडीवर धारदार चाकूने वार केले आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले
नाशिकच्या नांदगाव तालूक्यातील ६७ ग्रामपंचायतींची मुदत संपून ५ ते ६ महिने होऊन गेले
मात्र निवडणूका लांबणीवर पडल्याने तसेच प्रशासकांच्या नियुक्तीबाबात स्पश्ट आदेश नसल्याने ग्रामपंचायतींचा कारभार थंडावला आहे.
प्रशासक नसल्याने नागरीकांची अनेक कामे तसेच गावातील अनेक विकासाच्या कामांना खिळ बसली आहे.
विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्यांचा सत्कार करणार
संतोष चव्हाण यांचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार असल्याचे वक्तव्य
संग्राम बापू भंडारे यांनी विद्यानंद बापट यांच्यावर टीका केली
‘हा विद्यानंद नाही तर अ-विद्यानंद’ अशी बोचरी टीका
पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांकडून बांधावर जाऊन पाहणी
नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; शेतकऱ्यांना सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा दिलासा
यवतमाळ मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
11 ऑक्टोबर रोजी होणार मतदान
डीजे,स्पीकर विरोधात आज परत एकदा पुणेकर रस्त्यावर उतरणार
डीजे स्पीकर कर्ण करकश आवाज विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरणार
सकाळी 11 वाजता बालगंधर्व चौकामध्ये रस्त्यावर उतरून केला जाणारा विरोध
नागपुरात कायद्याला मान,सोलापुरात परंपरेचे भान,मग पुण्यातच लाऊड स्पीकरला का मोकळे रान?
लाऊड स्पीकर विरोधी पुणेकर मंच
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.