लातूरमध्ये चोरट्याने घरात घुसून दोन वयोवृद्ध नवरा-बायकोची हत्या करून घरातील दागिने लंपास केले. या चोरट्याने सोन्याचे दागिने लुटताना महिलेची हत्या केली. तर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेच्या नवऱ्याला विहीरीत टाकून दिलं. या चोरीच्या घटनेमुळे लातूरमध्ये खबळळ उडाली. लातूर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत चोरट्याला अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा त्याच गावात राहणारा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या गरसुळी गावामध्ये शेतात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या करून चोरट्याने घरातील दागिने लंपास केले. चोरी करताना चोरट्याने अत्यंत क्रूरपणे दोघांची हत्या केली. आधी चोरट्याने महिलेच्या डोक्यात कुकर घातला आणि नंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने अर्धांगवायू झालेल्या या महिलेच्या नवऱ्याला जवळच असलेल्या विहिरीत फेकून दिले. या घनेटत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत आरोपीला गजाआड केले. दरम्यान आरोपी हा गावातीलच असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. आरोपीने चोरीच्या उद्देशानेच वयोवृद्ध दाम्पत्याची हत्या केल्याचे तपासातून निष्पन्न झाले. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर 12 तासांत आरोपी पंडित रावणकोळेला अटक करण्यात आली.
पुष्पलता रावसाहेब कातळे (वय ५२ वर्षे ) आणि रावसाहेब मुकुंद कातळे (वय ६० वर्षे ) अशी चोरट्याने हत्या केलेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही रेणापुर तालुक्यातील गरसुळी येथे शेतातील घरामध्ये राहत होते. या दुहेरी हत्याकांडाने लातूर जिल्हा हादरून गेला. चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, कानातले लंपास केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चोरट्याविरोधात 187/2025 कलम103(1), 309(4), 331(3)(4) BNS नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.